23 September 2019 11:11 AM
अँप डाउनलोड

शिरूर'मध्ये आढळराव-पाटील पराभूत झाल्याने आ. सोनावणेंची डोकेदुखी वाढली

Sharad Sonawane, Shivsena, Shijavirao Adhalrao Patil, Udhav Thackeray, Raj Thackeray, Loksabha Election 2019

जुन्नर : लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेच मोठ्या थाटामाटात शिनबंधन बांधून घेणारे जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांची विधानसभेत डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील दिग्गज आणि बलाढ्य नेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी मानहानीकारक पराभव केल्याने या मतदार संघात येणाऱ्या जुन्नर विधानसभा क्षेत्रात सध्या शिवसेनेत असलेले आमदार शरद सोनावणे यांची डोकेदुखी वाढली आहे.

त्यात मंगलदास बांदल देखील राष्ट्रवादीच्या गोटात असल्याने त्यांची धाकधूक अधिकच वाढली आहे. आज जर ते मनसेत असते तर त्यांना या जागेवर दावा पक्का करता आला असता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालात चित्र पालटलं आहे आणि हा मतदारसंघ त्यांच्यासाठी धोक्याची घंटा झाला आहे. तसेच त्यांच्या धरसोड वृत्तीने मतदार राजा त्यांना अद्दल घडवू शकतो, असं म्हटलं जात आहे.

त्यामुळे लोकसभा निकालानंतर आमदार शरद सोनावणे यांना देखील शिवसेनेतून अंतर्गत विरोध होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी जुन्नरच्या शिवसेनेत दोन गट पडण्याची शक्यता अधिक आहे. त्याचा थेट फटका विद्यमान आमदार शरद सोनावणे यांना बसू शकतो असं स्थानिक राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे. त्यामुळे जुन्नर मतदारसंघावर इतर दावेदार देखील पुढे येऊ शकतात.

मराठी विवाह II अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Shivsena(571)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या