18 May 2024 9:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Bharat Rasayan Share Price | गुंतवणुकीत केमिकल लोचा नको? केमिकल कंपनी भारत रसायन शेअरने 6600% परतावा दिला, खरेदी करणार?

Bharat Rasayan Share Price

Bharat Rasayan Share Price | भारत रसायन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. भारत रसायन कंपनीच्या शेअरने मागील दहा वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 6,600 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी भारत रसायन कंपनीच्या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते ते आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7 लाख रुपये झाले असते.

मागील आठवड्याच्या शुक्रवारी भारत रसायन कंपनीचे शेअर 0.41 टक्के वाढीसह 8938.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी भारत रसायन कंपनीचे शेअर्स 0.39 टक्के वाढीसह 8,977.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारत रसायन या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,798.84 कोटी रुपये आहे. 16 मार्च 2023 रोजी भारत रसायन कंपनीचे शेअर्स 8,299 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 2 सप्टेंबर 2022 रोजी भारत रसायन या कंपनीचे शेअर्स 12,897.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 3798.84 कोटी रुपये बाजार भांडवल असलेल्या भारत रसायन कंपनीने मार्च 2023 तिमाहीत 305.8 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर याच तिमाहीत कंपनीने 32.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

भारत रसायन कंपनीचे शेअर्स आपल्या स्पर्धक कंपनीच्या तुलनेत स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. जीसीएल ब्रोकिंग फर्मच्यामते भारत रसायन कंपनीचे शेअर्सला 8200-8500 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. म्हणून शेअर बाजारातील तज्ञांनी घसरणीच्या काकात हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

भारत रसायन ही रासायनिक उत्पादन क्षेत्रात संशोधन आणि विकास व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः स्किनकेअर, हेअरकेअर, अँटी बॅक्टेरियल कॉस्मेटिक घटकांचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी मानली जाते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bharat Rasayan Share Price Today on 31 July 2023.

हॅशटॅग्स

#Bharat Rasayan Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x