
NINtec Systems Share Price | निंटेक सिस्टीम कंपनीचे शेअर्स 31 मार्च 2023 रोजी 260 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या किंमत पातळीवरून हा स्टॉक 150 टक्क्यांनी वाढला आहे. अवघ्या 5 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 705 कोटी रुपये आहे.
मागील आठवड्यात शुक्रवारी निंटेक सिस्टीम कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर 246 रुपये या आपल्या 52-आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी निंटेक सिस्टीम कंपनीचे शेअर्स 1.27 टक्के वाढीसह 652.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
अवघ्या 1 वर्षात निंटेक सिस्टीम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 600 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील दिवसापासून निंटेक सिस्टीम कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. नुकताच कंपनीच्या संचालक मंडळाने देखील आपल्या शेअर धारकांना 4:5 प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली होती. म्हणजेच रेकॉर्ड तारखेपर्यंत जे गुंतवणुकदार निंटेक सिस्टीम कंपनीचे 5 शेअर्स धारण करतील, त्यांना कंपनी बोनस म्हणून 4 शेअर्स मोफत देणार आहे.
गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 हा दिवस बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर करण्यात आला आहे. मागील 5 वर्षांत निंटेक सिस्टिम्स कंपनीच्या शेअर आपल्या गुंतवणूकदारांना 6000 टक्के नफा कमावून दिला आहे. याकाळात हा स्टॉक 10 रुपये वाढून 642 रुपये किमतीवर पोहचला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सध्या जर तुम्ही भरघोस परतावा कमवू इच्छित असा तर तुम्ही निंटेक सिस्टीम कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता.
निंटेक सिस्टीम ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग क्षेत्रात तज्ञ मानली जाते. ही कंपनी बुद्धिमान नवकल्पना निर्माण करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. विविध डेटाचा वापर करून ही कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात नवनवीन संकल्पना विकसित करत आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना व्यवसाय वाढीसाठी क्लाउड सेवा देखील प्रदान करते. यासह कंपनी अॅप्लिकेशन इंजिनीअरिंग क्षेत्रात अॅप्लिकेशन्स ऑप्टिमाइझ करून भविष्यात विविध उपक्रम तयार करण्याचे काम देखील करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.