
Cigniti Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सिग्निटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 1.1 टक्के घसरण पहायला मिळाली होती. आणि स्टॉक 782 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 5 दिवसांत सिग्निटी टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचा 1.42 टक्के तोटा केला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 6.40 टक्के कमजोर झाली आहे.
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 26.35 टक्के नफा कमावून दिला आहे. तर सिग्निटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत सहा महिन्यात 612 रुपयेवरून वाढून 782 रुपयेवर पोहोचली आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 26.35 टक्के नफा कमावला आहे. आज बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.01 टक्के घसरणीसह 781.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअरची कामगिरी :
1 ऑगस्ट 2022 रोजी सिग्निटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 537 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 45 टक्के वाढला आहे. मागील वर्षी 30 डिसेंबर 2022 रोजी सिग्निटी टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 527 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून गुंतवणूकदारांनी तब्बल 50 टक्के नफा कमावला आहे.
3 एप्रिल 2020 रोजी सिग्निटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 203 रुपये या नीचांकी किमतीवर पोहोचले होते. या नीचांकी किंमत पातळीवरून शेअरची किंमत तब्बल 300 टक्के वाढली आहे. 17 ऑक्टोबर 2014 रोजी रोजी सिग्निटी टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने 468 रुपये किंमत पातळीपासून प्रवास सुरू केला होता. त्यातून आतापर्यंत गुंतवणूकदारांनी 67 टक्के नफा कमावला आहे.
सिग्निटी टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीची स्थापना 1998 साली तेलंगणा मधील हैदराबाद येथे झाली होती. ही कंपनी आपल्या ग्राहकांना गुणवत्ता अभियांत्रिकी आणि सॉफ्टवेअर चाचणी सेवा प्रदान करण्याचे काम करते. 28 जुलै 2023 रोजी सिग्निटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.
चालू आर्थिक वर्षाच्या जून 2023 तिमाहीत सिग्निटी टेक्नॉलॉजी कंपनीने 16 टक्के वाढीसह 440 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर कंपनीच्या कामकाजी नफ्यात 40 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या तिमाहीत कंपनीने 62 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. सिग्निटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या PAT मध्ये 44 टक्के वाढ नोंदवली गेली असून कंपनीने 44.56 कोटी रुपये PAT कमावला आहे.
सिग्निटी टेक्नॉलॉजी ही कंपनी तिमाही-दर-तिमाही आधारावर आपल्या ऑपरेशनल प्रॉफिटमध्ये प्रचंड वाढ साध्य करत आहे. सिग्निटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या इक्विटीवरील परतावा प्रमाण 29 टक्के आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 190 टक्के मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. सिग्निटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2133 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते गुंतवणूक करण्यासाठी लोकांनी या स्टॉकबाबत सखोल अभ्यास करायला पाहिजे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.