 
						UFSL Share Price | उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. या कंपन्यांचे शेअर्स मागील दोन दिवसांत 18 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. उज्जीवन SFB कंपनीने कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 52.20 रुपये उच्चांक किंमत स्पर्श केली होती. तर इंट्रा-डे ट्रेडमध्ये हा स्टॉक 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता.
मागील दोन दिवसांत या कंपनीच्या शेअरची किंमत 18 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. आज बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी उज्जीवन फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 3.64 टक्के घसरणीसह 479.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकचे शेअर्स 3.32 टक्के घसरणीसह 48.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
12 डिसेंबर 2019 रोजी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकच्या शेअरने 62.80 रुपये ही विक्रमी उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. उज्जीवन SFB लवकरच आपली होल्डिंग कंपनी UFSL चे रिव्हर्स विलीनीकरण पूर्ण करण्याची शक्यता आहे. तर सध्या कंपनीतर्फे वरिष्ठ पदावर नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रिव्हर्स विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यास UFSL च्या शेअर धारकांना उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकचे 116 इक्विटी शेअर्स दिले जाणार आहेत.
09 मार्च 2023 रोजी स्टॉक एक्सचेंजकडून उज्जीवन फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेला विलगिकरण संबंधित एनओसी प्राप्त झाली आहे. मागील चार ट्रेडिंग सेशनमध्ये उज्जीवन फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 16 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. 28 जुलै 2016 रोजी उज्जीवन फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 547 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.
HDFC सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञाच्या मते उज्जीवन SFB ची ब्रँड बिल्डिंग संबंधित निर्णय, नवीन ग्राहक संपादन करण्याचे धोरण आणि किरकोळ ग्रॅन्युलर डिपॉझिटवर त्वरीत लक्ष केंद्रित केल्याने आणि डिजिटल उपक्रमांमध्ये चालू असलेल्या गुंतवणुकीमुळे ऑपरेटिंग खर्च उच्च राहण्याची शक्यता आहे.
एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मच्या तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, उज्जीवन फायनान्शिअल सर्व्हिसेस बँकेने दायित्व प्रोफाइल वाढवण्यासह नवीन व्यवस्थापन बदल कार्यक्षमतेने करणे खूप गरजेचे आहे. सर्व बाबींचा विचार करून शेअर बाजारातील तज्ञांनी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक 58 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		