
Vinsys IT Services IPO | सध्या शेअर बाजारात अनेक एसएमई कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. या IPO मध्ये गुंतवणूक करून लोक भरघोस नफा कमाई करत आहेत. असाच IPO म्हणजेच, विन्सिस आयटी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा आहे. विन्सिस आयटी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा IPO 1 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात लाँच करण्यात आला आहे.
अवघ्या काही तासांत हा IPO पूर्णपणे खरेदी झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये देखील गुंतवणूकदारांनी विन्सिस आयटी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या IPO ला भरघोस प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत या IPO ला 100 पट पेक्षा अधिक बोली प्राप्त झाली आहे.
विन्सिस आयटी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या IPO ला पहिल्याच दिवशी 100 टक्के बोली प्राप्त झाली होती. 1 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत व्हिन्सिस आयटी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे IPO शेअर्स 1.33 पट अधिक सबस्क्राइब झाले होते. किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 2.56 पट अधिक खरेदी झाला होता. तर गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 0.24 पट सबस्क्राइब झाला होता. मात्र या IPO मध्ये संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव असलेला कोटा अजून खरेदी झालेला नाही.
विन्सिस आयटी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या IPO स्टॉकची प्राइस बँड 121 रुपये ते 128 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आली होती. या कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉटमध्ये 1000 शेअर्स ठेवले आहेत. एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदाराला किमान 1,28,000 रुपये जमा करावे लागतील.
विन्सिस आयटी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा IPO 4 ऑगस्ट 2023 पर्यंत खुला राहील. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मात्र ग्रे मार्केटमध्ये विन्सिस आयटी सर्व्हिसेस लिमिटेड IPO स्टॉक 60 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच विन्सिस आयटी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 188 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.