
Suzlon Share Price | शेअर बाजारात गुंतवणुकदार नेहमी मजबूत फंडामेंटल्स असलेल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करत असतात. असाच एक स्टॉक म्हणजे सुझलॉन एनर्जी. या कंपनीच्या शेअरने अवघ्या सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. आज मात्र स्टॉकमध्ये 5 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. (Suzlon Energy Share Price)
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.11 टक्क्यांच्या वाढीसह 19.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.75 टक्क्यांच्या वाढीसह 19.85 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के घसरणीसह 18.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
शेअर परफॉर्मन्स :
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये लोकांना 3.67 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात हा स्टॉक 9.23 टक्के वाढला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 102.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 9.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सहा महिन्यांपूर्वी हा स्टॉक 10 रुपयांपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत होता.
अशाप्रकारे, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने अवघ्या सहा महिन्यांत लोकांना 102.76 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी सहा महिन्यांपूर्वी सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 2.10 लाख रुपये झाले आहे.
एका वर्षात पैसे तिप्पट :
1 ऑगस्ट 2022 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 6.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 181.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एक वर्षापूर्वी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.05 लाख रुपये झाले असते. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने लोकांना 71.50 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.