2 May 2024 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell?
x

Spicejet Share Price | स्पाइसजेट शेअर्स विमान वेगात, फक्त 2 दिवसात दिला 26 टक्के परतावा, फायदा घेणार?

Spicejet Share Price

Spicejet Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्पाइसजेट या एअरलाइन कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. गुरुवारी स्पाइसजेट कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 52.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

या कंपनीच्या शेअरमधील तेजीचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या संचालक मंडळाने नवीन भांडवल उभारणीच्या पर्यायांची पडताळणी करण्यासाठी 11 डिसेंबर 2023 रोजी बैठक आयोजित केली आहे. आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी स्पाइसजेट कंपनीचे शेअर्स 6.12% टक्के (BSE) वाढीसह 55.49 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्पाइसजेट कंपनी इक्विटी शेअर्स किंवा प्रेफरेंशियल आधारावर परिवर्तनीय सिक्युरिटीज जारी करून भांडवल उभारणीचे पर्याय तपासू शकते. कंपनीने मांडलेले आणि पारित केलेले प्रस्ताव कंपनीच्या शेअर धारकांच्या मान्यतेच्या अधीन असतील. स्पाइसजेटचे प्रवर्तक अजय सिंग देखील 100 दशलक्ष डॉलर्स भांडवल उभारणी करण्यासाठी विविध क्रेडिट फंडासोबत बैठका घेत आहेत. यासह कंपनी आपल्या कर्जाचे मूल्य निश्चित करण्याबाबत देखील विचार करत आहे.

जानेवारी-सप्टेंबर 2023 दरम्यान भारतीय विमान वाहतूकमध्ये स्पाइसजेट कंपनीचा वाटा 4.4 टक्के होता. तर इंडिगो कंपनीचा वाटा 63.4 टक्के होता. 2 डिसेंबर 2023 रोजी स्पाइसजेट कंपनीने निवेदन जाहीर करून माहिती दिली की, सप्टेंबर 2023 तिमाहीच्या आर्थिक निकालांवर विचार करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. स्पाइसजेट एअरलाईन कंपनीने जून 2023 तिमाहीत 197 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मात्र मागील वर्षी याच तिमाही कालावधीत स्पाइसजेट कंपनीला 783 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.

मागील एका महिन्यात स्पाइसजेट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 38.26 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 95.40 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 26.76 टक्के वाढली आहे. तर मागील पाच वर्षांत स्पाइसजेट कंपनीचा स्टॉक 64 टक्के घसरला होता.

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने विमान भाडेतत्त्वावर घेणारी कंपनी सेलेस्टियल एव्हिएशन आणि स्पाइसजेट यांना वादाच्या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे. स्पाईसजेट कंपनीने सेलेस्टियल एव्हिएशन सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीला पेमेंट केल्याची माहिती दोन्ही पक्षांच्या वकिलांनी न्यायाधिकरणासमोर सादर केली होती. त्यानंतर स्पाईसजेट कंपनीच्या वकिलाने या खटल्यासाठी वाढीव वेळ मिळावा अशी विनंती केली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Spicejet Share Price BSE 08 December 2023.

हॅशटॅग्स

#SpiceJet Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x