
GE Power Share Price | जीई पॉवर इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर 13 टक्के वाढीसह 181 रुपये किमतीवर पोहचले होते. आज देखील या कंपनीच्या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. जीई पॉवर इंडिया कंपनीच्या शेअर्सने आज 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी नवीन ऑर्डर मिळाल्याने पाहायला मिळत आहे.
जीई पॉवर इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 97.45 रुपये होती. नुकताच या कंपनीला 444 कोटी रुपये मूल्याचे नवीन कंत्राट मिळाले असल्याने गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी सुरू केली आहे. आज गुरूवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी जीई पॉवर इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 7.25 टक्के वाढीसह 190.85 रुपये किमतीवर पोहचली आहे.
GE पॉवर इंडिया लिमिटेड कंपनीला गुजराज राज्य विद्युत महामंडळाकडून 444 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. या करारासाठी गुजरात सरकारने कंपनीला लेटर ऑफ इंटेंट देखील इश्यू केले आहे. स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये GE पॉवर इंडिया कंपनीने कळवले आहे की, कंपनीला अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम या आधारावर FGD प्रणालीचे डिझाइन, अभियांत्रिकी, उत्पादन, पुरवठा, पॅकेजिंग आणि फॉरवर्डिंग, इंस्टॉलेशन कमिशनिंग आणि PG चाचणीसंबंधित काम करण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.
जीई पॉवर इंडिया लिमिटेड कंपनीला इरादा पत्र इश्यू केल्याच्या तारखेपासून 30 महिन्यांच्या आत कोणत्याही परिस्थितीत हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. या कराराचे मूल्य 444 कोटी रुपये असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. जीई पॉवर इंडिया कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांपासून जबरदस्त कामगिरी करत आहेत.
अवघ्या सहा महिन्यात जीई पॉवर इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने लोकांना 52.38 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी जीई पॉवर इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 126.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 2 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 181 रुपये किमतीवर पोहचले आहेत. जीई पॉवर इंडिया लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1210 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.