
Tata Power Share Price | टाटा समुहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. अवघ्या चार महिन्यांत टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 29 टक्के मजबूत झाले आहे. 28 मार्च 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 182.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.021 टक्के वाढीसह 235.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अवघ्या चार महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 29 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील काही दिवसांपासून टाटा पॉवर कंपनी संबंधित विविध सकारात्मक बातम्या पाहायला मिळत आहेत.
रेटिंग अपडेट :
अनेक रेटिंग एजन्सींनी टाटा पॉवर कंपनीच्या शेअरबाबत रेटिंग अपडेट केल्यामुळे मार्च 2023 नंतर स्टॉक तेजीत वाढू लागला आहे. S & P ग्लोबल फर्मने टाटा पॉवर स्टॉकवर एप्रिल ते जून तिमाहीत ‘BB +’ वर रेटिंग जाहीर केली होती. इंडिया रेटिंग फर्मने टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉकवर ‘IND AA’ रेटिंग जाहीर केली होती. त्याचप्रमाणे CRISIL ने देखील टाटा पॉवर कंपनीच्या नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्सना ‘क्रिसिल एए / स्टेबल’ रेटिंग जाहीर केली होती.
मजबूत तिमाही निकाल:
मार्च 2023 तिमाहीमधील कमाईमुळे टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती. 5 मे 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीमध्ये निव्वळ नफ्यात तब्बल 48 टक्के वाढ साध्य केली होती. मार्च 2023 तिमाहीत कंपनीच्या निव्वळ वाढ झाली आणि कंपनीने 939 कोटी रुपये नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत कंपनीने 632 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2023 तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 6 टक्क्यांच्या वाढीसह 12,755 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. 9 ऑगस्ट 2023 रोजी टाटा पॉवर कंपनी आपले जून 2023 ला संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे.
टार्गेट प्राईस :
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स पुढील काळात 300 रुपयेपर्यंत वाढू शकतात. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून संथ गतीने आणि स्थिरपणे आपल्या उच्चांक किंमत पातळीवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या तज्ञांनी टाटा पॉवर स्टॉकवर पैसे लावून 229 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आणि लक्ष किंमत 250 रुपये निश्चित केली आहे. GCL ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी 218 रुपयेच्या स्टॉपलॉससह टाटा पॉवर स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. काही तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक सध्याच्या किमतीवरून 300 रुपयेपर्यंत जाऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.