18 May 2024 2:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या
x

SEL Manufacturing Share Price | स्वस्त झालेला SEL मॅन्युफॅक्चरिंग शेअर पुन्हा तेजीत, गुंतवणूक करून फायदा घ्यावा? डिटेल्स जाणून घ्या

SEL Manufacturing Share Price

SEL Manufacturing Share Price | एसईएल मॅन्युफॅक्चरिंग या टेक्सटाइल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचा बाजार उठवला आहे. मागील एका वर्षापासून या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. मात्र मागील काही ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीच्या शेअरमध्ये उसळी पाहायला मिळत आहे.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 117.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स 2.00 टक्के वाढीसह 122.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील पाच दिवसापासून या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आणि हा स्टॉक 10 टक्के वाढला आहे. मागील एक वर्षभरापासून या कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. अवघ्या एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 84 टक्के कमजोर झाले आहेत. मागील दीड वर्षाचा विचार केला तर शेअरची किंमत तब्बल 93 टक्के घसरली आहे.

मागील एका वर्षात SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअर्सची किंमत 1975 रुपयेवरून घसरून सध्याच्या किमतीवर आली आहे. स्टॉक मध्ये घसरण होण्याचे कारण म्हणजे, कंपनीच्या डोक्यावर भरमसाठ कर्जाचे डोंगर आहे. मागील वर्षी कंपनीचे शेअर्स देखील बरेच दिवस ट्रेड होत नव्हते.

SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये जाहीर केलेल्या तिमाही निकालानुसार कंपनीला जबरदस्त तोटा सहन करावा लागला आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला 45.20 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. एक वर्षभरापूर्वी जून 2022 तिमाहीत कंपनीला 28.30 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीची एकूण विक्री 21.55 टक्के वाढीसह 142.57 कोटी रुपयेवर पोहचली होती. तर डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकूण सेल्स 117.29 कोटी रुपये होता. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 10.49 कोटी रुपये होता. तर डिसेंबर 2021 मध्ये कंपनीचा EBITDA 6.04 कोटी रुपये होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SEL Manufacturing Share Price today on 08 August 2023.

हॅशटॅग्स

#SEL Manufacturing Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x