27 July 2024 7:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

BHEL Share Price | एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे चार पटीने वाढले, BHEL स्टॉक Hold करावा की Sell?

BHEL Share Price

BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे. ही कंपनी मुख्यतः अवजड अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करते. मार्च तिमाहीच्या निकालानंतर बीएचईएल स्टॉक तब्बल 8 टक्के घसरणीसह 295 रुपये किमतीवर आला होता. आज गुरूवार दिनांक 23 मे 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 1.24 टक्के वाढीसह 305.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )

मागील एका वर्षात बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 278 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात हा स्टॉक 79.30 रुपयेवरून वाढून 319.20 रुपये किमतीवर पोहोचला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास चौपट केले आहे.

21 मे 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 322.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 77.30 रुपये होती. मंगळवारी या कंपनीने आपले तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. मार्च 2024 तिमाहीत बीएचईएल कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 498.6 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 658 कोटी रुपये नोंदवला गेला होता, जो या तिमाहीत 25.6 टक्क्यांनी घसरला आहे. मार्च तिमाहीत बीएचईएल कंपनीने 0.4 टक्क्यांच्या वाढीसह 8,260 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत कंपनीने 8,227 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

बीएचईएल कंपनीचा EBITDA 30.6 टक्क्यांनी वाढून 728 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा EBITDA 1,049 कोटी रुपये नोंदवला गेला होता. कंपनीचे मार्जिन 8.8 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, जे एका वर्षभरापूर्वी 12.8 टक्के नोंदवले गेले होते. बीएचईएल कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 साठी 25 पैसे प्रति शेअर अंतिम लाभांश वाटप केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 23 May 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x