
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी स्टॉक 5.08 टक्के वाढीसह 182 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाही निकालानंतर आयआरएफसी स्टॉक तेजीत आला आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठया प्रमाणात खरेदी केले जात होते. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
मार्च तिमाहीत आयआरएफसी कंपनीचा निव्वळ नफा 34 टक्के वाढून 1717.3 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी मार्च तिमाहीत आयआरएफसी कंपनीने 1285.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आज गुरूवार दिनांक 23 मे 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 6.40 टक्के वाढीसह 186.90 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
अरिहंत कॅपिटल फर्मच्या तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी आयआरएफसी स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 166 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावला पाहिजे. जानेवारी-मार्च तिमाहीत आयआरएफसी कंपनीचे एकूण उत्पन्न 6470.9 कोटी रुपये नोंदवले गेले होते. या कालावधीत कंपनीचा एकूण खर्च 4760.6 कोटी रुपये नोंदवला गेला होता. याशिवाय, कंपनीच्या संचालक मंडळाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 70 पैसे अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 193.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 31.21 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,34,383.66 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 452.14 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.