
Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ झाल्यानंतर आता भाव घसरल्याने दागिने घेण्याचा विचार करणारे लोक खूप खूश आहेत. आज बुधवारी सराफा बाजारात दोन्ही धातूंमध्ये घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने आणि चांदी च्या किंमतीत वाढ पाहायला मिळत आहे. मागील सत्रात सोने 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 68,000 रुपयांवर बंद झाली होती. (Gold Price Today)
आज एमसीएक्सवर सोन्याचा दर किती?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात वाढ दिसून आली. दुपारनंतर सोने ५१ रुपयांनी वधारून ५९२९९ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ५० रुपयांनी वाढून ७०२६६ रुपये प्रति किलो झाली. एमसीएक्सवर मंगळवारी सोने 59248 रुपये आणि चांदी 70216 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
आज सराफा बाजारात सोन्याच्या दरांमध्ये घसरण
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले जातात. आयबीजीएने (आयबीजेए) बुधवारी दुपारी https://ibjarates.com केलेल्या वेबसाइटवर जाहीर केलेल्या दरानुसार सोन्या-चांदीत घसरण झाली. बुधवारी सोन्याचा भाव 100 रुपयांनी घसरून 59247 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 500 रुपयांनी घसरून 70527 रुपये प्रति किलो ग्रॅम झाला.
याआधी मंगळवारी सोन्याचा भाव 59338 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 71051 रुपये प्रति किलो ग्रॅम होता. बुधवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 59010 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
आज सोनं उच्चांकी पातळीपेक्षा 2,338 रुपये स्वस्त
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 2,338 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते. तर चांदीचा भाव 70527 रुपये प्रति किलोवर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 71051 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रति किलो ५२४ रुपयांची घसरण झाली आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.