4 May 2024 10:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Supreme Industries Share Price | लॉटरी शेअर! अवघ्या 80 हजार गुंतवणुकीवर 12471 टक्के परतावा, गुंतवणूकदार करोडपती झाले

Supreme Industries Share Price

Supreme Industries Share Price | ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ या प्लास्टिक उत्पादना करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची घसरण सुरू आहे. 2023 या वर्षात हा स्टॉक फक्त 5 टक्क्यांनी वाढला आहे, मात्र दीर्घकालीन गुंतवणुकदार या स्टॉकमुळे करोडपती झाले आहे. मागील 14 वर्षात अवघ्या 80,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोक करोडपती झाले आहेत. ब्रोकरेज फर्म शेअरखान ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, सध्याच्या किंमत पातळीपासून या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढू शकतात. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के घसरणीसह 2,511.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Supreme Industries Limited)

ब्रोकरेज फर्मचा सल्ला :
चालू आर्थिक वर्षाच्या मार्च 2023 तिमाहीत पीव्हीसीच्या किमतीमध्ये वाढ झाली असल्याने ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ कंपनीला त्याचा फायदा होऊ शकतो. मागील चार तिमाहीपासून सातत्याने सुरू असलेल्या घसरणीनंतर जानेवारी-मार्च 2023 मध्ये पीव्हीसीच्या किमती आता 9.2 टक्क्यांनी म्हणजेच 7.9 रुपये प्रति किलो या दराने वाढल्या आहेत. निवासी घरांची वाढती मागणी आणि प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, स्मार्ट सिटीजमधील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ कंपनीचा व्यवसाय आर्थिक वर्ष 2023-2024 आणखी वाढू शकतो. क्रिसिलच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये प्लास्टिक पाईपच्या किमतीत 13-15 टक्के वाढ अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षात हाच दर सुमारे 22-24 टक्क्यांच्या उच्च दराने वाढला आहे. परंतु सुप्रीम इंडस्ट्रीज कंपनीच्या बाबतीत ही दर वाढ 35 टक्क्यांपेक्षा अधिक होती.

याशिवाय कंपनीने 16,800 मेट्रिक टन क्षमतेच्या ओडिशा प्लांटमधून फेब्रुवारीच्या मध्यापासून व्यावसायिक उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. चालू आर्थिक वर्षात ग्रीनफिल्ड क्षमता आणि ब्राउनफिल्ड क्षमतेत कमालीची वाढ झाली आहे, त्यामुळे सुप्रीम कंपनीची वाढ इतर स्पर्धक उद्योगाच्या वाढीपेक्षाही जास्त असण्याचा अंदाज आहे. या सर्व कारणांमुळे ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

80 हजारांवर करोडपती :
20 मार्च 2009 रोजी ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 20.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 2,511.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 14 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12471 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या 80 हजार रुपये लावणाऱ्या लोकांना या कंपनीच्या स्टॉकने करोडपती बनवले आहे. 28 फेब्रुवारी 2023 रोजी हा स्टॉक 2816.45 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचला होता. तर 23 जून 2022 रोजी हा स्टॉक 1668.60 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. आपल्या नीचांक किंमत पातळीपासून स्टॉक आता 52 टक्के मजबूत झाला आहे. तरीही तो अजून आपल्या उच्चांक किंमत पातळीपासून 10 टक्के खाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Supreme Industries Share Price BSE 509930 NSE SUPREMEIND on 24 March 2023.

हॅशटॅग्स

Supreme Industries Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x