12 May 2024 10:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

सत्तेचा माज? शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाविरुद्ध म्युझिक कंपनीच्या सीईओचं अपहरण केल्याचा गुन्हा

MLA Prakash Surve

MLA Prakash Surve’s Son | गोरेगाव पूर्व भागातून खंडणीसाठी व्यापारी राजकुमार सिंह यांचे अपहरण केल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आणि इतरांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी एफआयआरमध्ये आमदार पुत्र राज सुर्वे यांच्यासह पाच ज्ञात आणि १० ते १२ अनोळखी आरोपींचा उल्लेख केला आहे. व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाटणा येथील मनोज मिश्रा यांना दिलेल्या बिझनेस लोनची परतफेड करण्यासाठी त्यांना काल त्यांच्या कार्यालयातून जबरदस्तीने उचलून बंदुकीचा धाक दाखवून दबाव टाकण्यात आला.

राजकुमार यांना दहिसर येथील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयात नेण्यात आले असता आमदार पुत्र राज सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदुकीचा धाक दाखवून प्रकरण मिटवा आणि याबाबत कोणाशीही बोलू नका, अशी धमकी दिली अशी माहिती दिली आहे.

राज सुर्वेंवर नेमका आरोप काय?
राज प्रकाश सुर्वे याच्याविरुद्ध राजकुमार जगदीश सिंग (वय 38) यांनी तक्रार दिली आहे. ते ग्लोबल म्युझिक जंक्शन प्रा.लि. या कंपनीचे सीईओ आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची कंपनी डिजिटल लॅटरल ठेवून कर्जही देते.

तक्रारीत म्हटलं आहे की, मनोज मिश्रा यांची आदिशक्ती प्रा.लि. म्युझिक कंपनी आहे. त्यांना राजकुमार सिंग हे 2019 पासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखतात. मनोज मिश्रांना पैशाची गरज होती. त्यामुळे त्या कंपनीचे लायसन्स गहाण ठेवून कर्ज दिले. तसे एका वर्षासाठी करारही झाला होता.

मनोज मिश्राने 2021 मध्ये ग्लोबल म्युझिक कंपनीकडून 8 कोटींचं कर्ज घेतले. झालेल्या कराराप्रमाणे त्यांच्याकडून 11 कोटी रुपये मिळणार होते. हे करारपत्र 2026 पर्यंत होते. मात्र, मनोज मिश्राने दिलेल्या पैशाचा वापर इतर गोष्टींसाठी केला आणि त्याच्या परिणाम नफ्यावर झाला, असे तक्रारीत म्हटलं आहे.

सिंग यांनी मिश्रांना कंटेट बनवण्यास सांगितले. त्यावर मिश्रांनी आणखी पैसे मागितले. त्याला पैसे सिंग यांनी देण्यास नकार दिल्यानंतर त्याने करार रद्द करण्यासाठी दबाव आणण्यास सुरूवात केली. पण, सिंग यांनी त्याला सेटलमेंट करूयात असे सांगितले.

News Title : MLA Prakash Surve Son Raj Surve check details on 10 August 2023.

हॅशटॅग्स

#MLA Prakash Surve(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x