16 May 2024 10:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचे भाव 1300 रुपयांनी घसरले, आजचे तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याचे नवे दर पटापट तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. ऑगस्ट महिन्यात सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. ऑगस्टमध्ये आतापर्यंत सोनं 1300 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या दरातही 5600 रुपयांची घसरण झाली आहे. आज एमसीएक्सच्या पातळीवर सोने-चांदीचे भाव किती ट्रेड करत आहेत ते पाहूया.

एमसीएक्सवर सोने-चांदीत किती घसरण झाली?

एमसीएक्सवर सोन्याचा भाव 100 रुपयांच्या घसरणीसह 58769 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजमध्ये सोन्याचा भाव 59,000 च्या खाली घसरला आहे. तर चांदीच्या दरातही 125 रुपयांनी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर एक किलोचा भाव 69855 रुपये आहे.

1300 रुपयांची घसरण कशी झाली?

31 जुलै रोजी सोन्याचा भाव 60082 रुपयांच्या पातळीवर होता. तर ट्रेडिंग सेशनदरम्यान सोन्याचा भाव 58740 रुपयांवर आला असून त्यानुसार सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 1342 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे.

उच्चांकापासून सोनं किती स्वस्त?

सध्या सोन्याचा भाव उच्चांकापासून 2,694 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त झाला आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते. तर चांदीचा भाव 70170 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 70176 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रति किलो सहा रुपयांची घसरण झाली आहे.

जागतिक बाजारात सोन्या-चांदीची स्थिती काय आहे?

आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाले तर अमेरिकेत महागाईचे आकडे आल्यानंतरच जागतिक बाजारात चढ-उतार होत आहेत. दरम्यान, सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. कॉमेक्सवर सोन्याचा भाव 1944 डॉलर प्रति औंस आहे. याशिवाय चांदी 22.70 डॉलर प्रति औंस वर आहे.

खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

तुम्हीही बाजारात सोनं खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅपचा ही वापर करू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता की ते खरे की नकली. याशिवाय या अॅपच्या माध्यमातूनही तुम्ही तक्रार करू शकता.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Update check details on 11 August 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(215)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x