17 May 2024 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

Shoora Designs IPO | आला रे आला IPO आला! IPO शेअरची किंमत 48 रुपये, पहिल्याच दिवशी किती कमाई होणार?

Shoora Designs IPO

Shoora Designs IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून फायदा कमवू इच्छित असाल तर, ही बातमी तुमच्या कामाची आहे. लवकरच शूरा डिझाइन्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. शूरा डिझाइन्स कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे जमा करा, कारण हा IPO 17 ऑगस्ट 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. शूरा डिझाइन्स कंपनी कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 48 रुपये जाहीर केली होती. (Shoora Designs Share Price)

IPO तपशील :

शूरा डिझाइन्स कंपनीचा आयपीओ या आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. IPO लाँच करताना सर्व कंपन्या आधी, आपली लॉट साइज जाहीर करतात. या लॉटमध्ये कंपनीद्वारे शेअर्स ठेवले जातात. IPO लॉट म्हणजे एक प्रकारचा बास्केट असतो. शूरा डिझाईन्स ही कंपनी आपल्या आयपीओची लॉटमध्ये 3000 शेअर्स जारी करणार आहे. एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांना 144000 रुपये जमा करावे लागणार आहे. किरकोळ गुंतवणुकदार कमाल 2 लॉट खरेदी करू शकतात. म्हणजेच त्यांना एकावेळी जास्तीत जास्त 6000 शेअर्स खरेदी करता येईल.

IPO बद्दल एक्स्ट्रा माहिती :

शूरा डिझाइन्स ही कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून खुल्या बाजारातून 2.03 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. शूरा डिझाईन कंपनीचा IPO 17 ऑगस्ट 2023 ते 21 ऑगस्ट 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी ओपन ठेवला जाईल. गुंतवणूकदारांना 24 ऑगस्ट रोजी शेअरचे वाटप केले जातील. आणि हा IPO स्टॉक 29 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल.

शूरा डिझाइन्स कंपनीचा IPO स्टॉक BSE SME इंडेक्समध्ये सूचीबद्ध केला जाणार आहे. शूरा डिझाईन्स या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 100 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. IPO नंतर प्रवर्तकांकडे 71.77 टक्के भाग भांडवल राहील. कंपनीच्या प्रवर्तकमध्ये सतीश के, सेजलबेन सतीश, राजेशभाई सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shoora Designs IPO is ready to launch check details on 14 August 2023.

हॅशटॅग्स

Shoora Designs IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x