
Adani Power Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात सुस्ती पाहायला मिळत होती, मात्र अदानी समूहाचे शेअर्स मजबूत तेजी धावत होते. अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. आज देखील अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत धावत आहेत.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 288.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यापूर्वीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 279.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज तर अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने सर्वांना सुखद धक्काच दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 10.61 टक्के वाढीसह 316.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स अदानी समुहातील सूचिबद्ध असलेल्या 7 कंपन्यांमध्ये सर्वात स्वस्त आहेत. यामध्ये अदानी समुहातर्फे अधिग्रहित करण्यात आलेल्या कंपन्यांचा समावेश नाही. अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे यूएस इन्व्हेस्टमेंट फर्म GQG पार्टनर्सने अदानी पॉवर कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. जीक्यूजी पार्टनरने अदानी पॉवर कंपनीचे तब्बल 8.1 टक्के भाग भांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. यासाठी त्यांनी तब्बल 1.1 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. जीक्यूजी पार्टनरने या डीलमध्ये अदानी पॉवर कंपनीचे तब्बल 31 कोटी शेअर्स खरेदी केल्याची माहिती मिळत आहे.
भारतीय शेअर बाजारात शेअर खरेदीचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सौदा असल्याचे तज्ञ म्हणत आहेत. गोल्डमन सॅक्स फर्मने अदानी पॉवर कंपनीचे 10,30,30,127 शेअर्स 279.15 रुपये किमतीवर खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. या डीलमध्ये गोल्डमन सॅक्स फंडने अदानी पॉवर कंपनीमध्ये 2876 कोटी रुपयेची गुंतवणूक केली आहे.
अदानी पॉवर कंपनीचे प्रवर्तक म्हणजेच गौतम अदानी यांच्या कुटुंबाकडे असलेले जीक्यूजीला 1.1 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीवर विकण्यात आले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते ही पूर्ण डील 9,000 कोटी रुपये मध्ये झाली आहे. याआधी देखील GQG Partners फर्मने अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणूक करून 6.8 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. मार्च 2023 पासून आतापर्यंत GQG Partners ने अदानी समूहाच्या चौथ्या कंपनीमध्ये एवढी मोठी गुंतवणूक केली आहे.
जानेवारी 2023 मध्ये हिंडेनबर्ग रिसर्च फर्मच्या अहवालानंतर अदानी ग्रुप कंपन्यांचे शेअर्स क्रॅश झाले होते. आणि जीक्यूजी फर्मने मार्च 2023 पासून अदानी समुहाच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. मार्च 2023 मध्ये अदानी समुहाच्या प्रवर्तकांना GQG ला विकलेल्या शेअरमधून 15,446 कोटी रुपये मिळाले होते. तर मे महिन्यात अदानी समुहाला गुंतवणुकीतून 11,330 कोटी रुपये मिळाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.