
South Indian Bank Share Price | साऊथ इंडियन बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साऊथ इंडियन बँकेचे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह 23.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. स्टॉक ओपनिंगनंतर सुरुवातीच्या काही तासात साऊथ इंडियन बँकेचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते.
साऊथ इंडियन बँकेच्या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने साऊथ इंडियन बँकेच्या संचालक आणि सीईओ यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी साऊथ इंडियन बँकेचे शेअर्स 6.16 टक्के वाढीसह 22.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
नुकताच साऊथ इंडियन बँकेने आपल्या स्टॉक मार्केट नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, रिझर्व्ह बँकेने साऊथ इंडियन बँकेच्या संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पी आर शेषाद्री यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. ही नियुक्ती 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार आहे. पीआर शेषाद्री यांना 3 वर्षासाठी सीईओ आणि संचालक म्हणून नियुक्त करण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध होताच, गुंतवणूकदारांनी साऊथ इंडियन बँकेचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली. साउथ इंडियन बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 23.69 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 7.86 रुपये होती.
नुकताच साऊथ इंडियन बँकेने आपले जून तिमाहीचे निकाल देखील जाहीर केले होते. जून तिमाहीत साऊथ इंडियन बँकेच्या नफ्यात तब्बल 75 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत साऊथ इंडियन बँकेने 202 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत साऊथ इंडियन बँकेच्या निव्वळ नफ्यात 75 टक्के वाढ झाली असून बँकेने 115 कोटी रुपये निव्वळ कमावला आहे.
एप्रिल-जून 2023 या तिमाहीत साऊथ इंडियन बँकेने एकूण 2386 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत 1868 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या बँकेच्या निव्वळ नफ्यात वाढ बुडित कर्जामध्ये घट झाल्यामुळे साध्य झाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.