14 December 2024 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या
x

Nitiraj Engineers Share Price | स्वस्त शेअर देतोय फायदा, नीती राज इंजिनियर्स शेअरने कमी कालावधीत दिला 51 टक्के परतावा

Nitiraj Engineers Share Price

Nitiraj Engineers Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नीती राज इंजिनियर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.47 टक्क्यांच्या घसरणीसह 107 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नीती राज इंजिनियर्स या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 110 कोटी रुपये आहे. नीती राज इंजिनियर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 115 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 66 रुपये होती.

नीती राज इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 71 रुपयेवरून वाढून 107 रुपये किमतीवर पोहचली आहे. आज गुरूवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी नीती राज इंजिनियर्स स्टॉक 0.92 टक्के घसरणीसह 108.00 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील 1 वर्षात नीती राज इंजिनियर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 42 टक्के वाढली आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 146 टक्के नफा कमावून दिला आहे. 24 सप्टेंबर 2021 रोजी नीती राज इंजिनियर्स स्टॉक 42 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या नीचांकी किमतीवरून हा स्टॉक 200 टक्के वाढला आहे.

नीती राज इंजिनियर्स कंपनीने सेबी दिलेल्या माहिती कळवले आहे की, त्यांना कोलकात्याच्या Link Well Tele Systems Private Limited कंपनीकडून 2500 मशीनचा पुरवठा करण्याची एक ऑर्डर मिळाली आहे. यापैकी नीती राज इंजिनियर्स कंपनीला आंध्र प्रदेशच्या बाल विकास संस्थेकडून 19,236 मशिन्स पुरवण्याची ऑर्डर देण्यात आली आहे.

नीती राज इंजिनियर्स लिमिटेड अनेक प्रकारचे मोजणी बनवण्याचे काम करते. ही कंपनी इलेक्ट्रॉनिक वजन मोजण्याचे यंत्र आणि प्रणाली, चलनी नोटा मोजणी मशीन आणि डिजिटल मीटर मशीन बनवण्याचे काम करते. नीती राज इंजिनियर्स ही कंपनी फिनिक्स या ब्रँड नावा अंतर्गत मशीन्स बनवते आणि जगभरात निर्यात करते. मागील 3 वर्षांत नीती राज इंजिनियर्स कंपनीच्या शेअरची किंमत 27 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nitiraj Engineers Share Price today on 05 October 2023.

हॅशटॅग्स

Nitiraj Engineers Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x