
Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत होते. मात्र नंतर हा स्टॉक खाली आला. आता पुन्हा एकदा अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्के पेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत होते.
अदानी ग्रीन एनर्जी मधील तेजीचे कारण म्हणजे, त्यांची सहयोगी कंपनी असलेल्या मुंद्रा सोलर एनर्जी कंपनीला गुजरात राज्यात मुंद्रा येथील सोलर फोटोव्होल्टेइक उत्पादन प्रकल्पाचला भारतीय सौर ऊर्जा महामंडळकडून मंजूरी देण्यात आली आहे. या प्लांटची वीज निर्मिती क्षमता वार्षिक 2.0 GW आहे. शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 7.02 टक्के वाढीसह 999 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
शुक्रवारी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 940 रुपये किमतीवर ओपन झाले होते. नंतर हा स्टॉक 1024.95 रुपये किमतीवर पोहचला होता. शेअरमधील या वाढीमुळे अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे बाजार भांडवल 1.59 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 56 टक्के कमजोर झाली आहे. तर 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतपर्यंत हा स्टॉक 46 टक्के कमजोर झाला आहे.
23 ऑगस्ट 2022 रोजी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2574.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 28 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 439.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता.
अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरची RSI लेव्हल 36 वर आहे, जी स्टॉक जास्त खरेदी केलेला नाही किंवा जास्त विकला गेला असे निर्देश करत आहे. कंपनीच्या शेअरची वार्षिक बीटा 1.1 आहे. मागील एका वर्षभरात अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स अत्यंत अस्थिरतेत आणि विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या खाली ट्रेड करत आहे.
अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने मुंद्रा सोलर एनर्जी प्लांटमध्ये 26 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. ही उत्पादन सुविधा AREH4L ला देण्यात आली होती. जी आता उत्पादन निविदाचा एक भाग म्हणून स्थापन केली गेली आहे. या ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता 8 GW आहे.
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने जून 2023 च्या तिमाहीमध्ये जाहीर केलेल्या आर्थिक निकालात निव्वळ नफा 51 टक्के वाढला असल्याची माहिती दिली आहे. जून तिमाहीत अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने 323 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील वर्षीच्या जून तिमाहीत फक्त 214 कोटी रुपये नोंदवला गेला होता. यासह कंपनीचे इतर उत्पन्न देखील वाढून 228 कोटी रुपयेवर पोहचले आहे, जे मागील वर्षी जून तिमाहीत 66 कोटी रुपये नोंदवले गेले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.