
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 325.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये सलग तीन दिवस खरेदी पाहायला मिळत आहे.
सोमवारी तर हा स्टॉक 6.52 टक्क्यांच्या वाढीसह 324.50 रुपये या च्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. आज देखील अदानी पॉवर स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 3.82 टक्के वाढीसह 337.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी पॉवर कंपनीच्या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, कंपनीला भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि महान एनर्जी लिमिटेड ही पूर्वी एस्सार पॉवर एमपी लिमिटेड या नावाने ओळखली जात होती, या दोन्ही कंपनीकडून नवीन ऑर्डर मिळाली प्राप्त झाली आहे. महान एनर्जी ही कंपनी अदानी पॉवरची पूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. अदानी पॉवर कंपनी अबू धाबी नॅशनल एनर्जी कंपनीसोबत गुंतवणुकीच्या चर्चेत सामील नाही अशी माहिती कंपनीने दिली आहे.
मागील आठवड्यात GQG Partners या अमेरिकन गुंतवणूक फर्मने अदानी पॉवर कंपनीचे 8.1 टक्के भाग भांडवल खरेदी करून 1.1 अब्ज डॉलर्स गुंतवणूक केली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये यूएस स्थित हिडेनबर्ग कंपनीने जाहीर केलेल्या अहवालानुसार अदानी पॉवर स्टॉक क्रॅश झाला होता. मागील सहा महिन्यांत या स्टॉकमध्ये 88.40 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
अदानी पॉवर कंपनीने 30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. जून 2023 तिमाहीत अदानी पॉवर कंपनीने 83.30 टक्के वाढीसह 8,759 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी जून 2022 तिमाहीत कंपनीने 4,780 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. अदानी पॉवर कंपनीने जून 2023 तिमाहीत 16.80 टक्क्यांच्या वाढीसह 18,109 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या जून तिमाहीत कंपनीने 15,509 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते अदानी पॉवर स्टॉक दीर्घकालीन आणि शॉर्ट टर्म मूव्हिंग अॅव्हरेजवर सकारात्मक वाढीचे संकेत देत आहे. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स आणि मूव्हिंग अॅव्हरेज कन्व्हर्जन डायव्हर्जन इंडेक्समधून देखील अदानी पॉवर स्टॉकमध्ये वाढीचे संकेत मिळत आहेत. पुढील काही आठवड्यात या कंपनीचे शेअर 350 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स अदानी समूहातील सर्वात स्वस्त शेअर म्हणून ओळखले जातात. अदानी ग्रुपच्या एकूण 7 कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. अदानी एंटरप्रायझेस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट्स, अदानी विल्मार, अदानी पॉवर या कंपन्या अदानी समूहातील मुख्य कंपन्या आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.