12 October 2024 3:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Login | पगारदारांनो, तुम्ही गरजेच्या वेळी EPF मधून पैसे काढता, नवा नियम लक्षात घ्या, होतं खूप मोठं नुकसान - Marathi News Post Office Scheme | महिलांनो पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवा आणि 32,000 रुपयांपर्यंत व्याज मिळवा, जाणून घ्या योजनेविषयी Post Office Interest Rate | पोस्ट ऑफीसची खास योजना, बचतीवर व्याजानेच कमवाल 2 लाख रुपये, फायदाच फायदा - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेण्याआधी स्वतःला विचारा हे प्रश्न, नुकसान होणार नाही आणि मिळतील अनेक फायदे - Marathi News EPFO Passbook | पगारातून EPF चे पैसे कापले जातात, असा घ्या फायदा, EPF खात्यात जमा होतील 3 ते 5 करोड - Marathi News Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तन, या 6 राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरु होतोय, तुमची राशी कोणती - Marathi News Gold Rate Today | बापरे, दसऱ्याच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव वाढले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर जाणून घ्या - Marathi News
x

Apollo Pipes Share Price | या कंपनीच्या शेअरची किंमत इतक्या तेजीत वाढली की गुंतवणुकदार करोडपती झाले, परतावा पाहून गुंतवणूक करा

Apollo Pipes Share Price

Apollo Pipes Share Price | चांगला व्यवसाय आणि मजबूत व्यवस्थापन असलेल्या कंपन्यांचे शेअर्स नेहमी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून देतात. अशा कंपन्यांच्या शेअर्सवर पैसे लावून गुंतवणूकदार जोरदार परतावा कमवू शकतात. अशीच एक स्मॉल कॅप कंपनी आहे, जिच्या शेअर ने आपल्या गुंतवणुकदारांना श्रीमंत बनवले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘अपोलो पाईप्स लिमिटेड’. अपोलो पाईप्स कंपनीचे शेअर्स 5 रुपये किमतीवरून 500 रुपयांवर पोहचले आहेत. या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने 1 लाख रुपये गुंतवणूकीवर लोकांना 3 कोटींहून अधिक परतावा कमावून दिला आहे. (Apollo Pipes Limited)

बोनस शेअरची कमाल :
‘अपोलो पाईप्स’ कूनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपयांवर 3.7 कोटी रुपये परतावा कमावून दिला आहे. 2 एप्रिल 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 4.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी ‘अपोलो पाईप्स’ कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 22,727 शेअर्स मिळाले असते. ‘अपोलो पाईप्स’ कंपनीने डिसेंबर 2021 रोजी 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. बोनस शेअर्स मिळाल्यानंतर तुमच्या एकूण शेअर्सची संख्या 68,181 झाली असती. आज 31 मार्च 2023 रोजी ‘अपोलो पाईप्स’ कंपनीचे शेअर्स 0.72 टक्के वाढीसह 549.00 रुजये किमतीवर क्लोज झाले आहेत. या प्रकरणात तुमच्या एकूण 68,181 शेअर्सचे मूल्य 37,431,369 रुपये झाले असते.

गुंतवणुकीवर परतावा :
अपोलो पाईप्स कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 19 लाखांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 85.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 3 वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 1167 शेअर्स मिळाले असते. बोनस शेअर्स मिळाल्यानंतर तुमच्या एकूण शेअर्सची संख्या 3501 शेअर्स झाली असती. ‘अपोलो पाईप्स’ कंपनीने डिसेंबर 2021 मध्ये 2 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. 31 मार्च 2023 रोजी ‘अपोलो पाईप्स’ कंपनीचे शेअर्स 549 रुपयांवर क्लोज झाले होते. अशा स्थितीत तुमच्या शेअर्सचे एकूण मूल्य आज 20 लक्ष रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Apollo Pipes Share Price on 31 March 2023.

हॅशटॅग्स

Apollo Pipes Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x