8 May 2024 7:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

मोदी है तो मुमकिन है! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फक्त एकदिवसीय ग्रीस दौऱ्याची जादू, अदानी ग्रुप थेट ग्रीसमध्ये पोर्ट्स अधिग्रहण करणार

Adani Group

PM Modi Visit to Greece | अब्जाधीश गौतम अदानी यांच्या अदानी समूहाची परदेशात मोठी डील होऊ शकते. समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स ग्रीक बंदर ताब्यात घेण्याच्या योजनेवर काम करत आहे. या माध्यमातून युरोपला होणारी भारतीय निर्यात सोपी होणार आहे. तसेच भारतात निर्यातीत चौथ्या स्थानी घसरलेल्या गुजरात राज्याला देखील यामधून मोठा फायदा होईल असं देखील या घडामोडीतून स्पष्ट होतंय. याच वर्षाच्या सुरुवातीला अदानीने इस्रायलचे प्रसिद्ध हायफा बंदर ही विकत घेतले होते.

पंतप्रधान मोदींच्या एक दिवसीय दौऱ्यात ग्रीसमधील बंदरांच्या अधिग्रहणावर चर्चा

द टेलिग्राफने ग्रीक सिटी टाईम्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक दिवसीय दौऱ्यात ग्रीसमधील बंदरांच्या अधिग्रहणावर चर्चा झाली. ही प्रक्रिया सुरू झाल्यास अदानी समूहाला एक किंवा अधिक बंदरे ताब्यात घेण्यास स्वारस्य असू शकते, असे अहवालात म्हटले आहे. अदानी समूह उत्तर ग्रीसमधील कावाला आणि व्होलोस बंदरे ताब्यात घेण्याचा विचार करण्याची शक्यता आहे. हे अथेन्सपासून ३३० किमी अंतरावर आहे. याशिवाय अदानी समूहाला अलेक्झांड्रोपोली बंदरातही रस असू शकतो.

पिरेयस बंदरावर चीनचा कब्जा

अथेन्सजवळील ग्रीसच्या पिरेयस बंदराचा वापर युरोपीय निर्यातीसाठी करण्याच्या शक्यतेचाही भारत शोध घेत असल्याची चर्चा स्थानिक ग्रीक माध्यमांमध्ये आहे. मात्र, या बंदरावर चीनचे नियंत्रण आहे. चीनची कॉस्को शिपिंग ही पिरेयस बंदराची ६७ टक्के हिस्सेदारीसह प्रमुख भागधारक आहे. चीनने पिरायसला या भागातील सर्वात मोठे बंदर बनवले आहे. शी जिनपिंग यांनी 2019 मध्ये या बंदराला भेट दिली होती आणि चीनच्या युरोपसोबतच्या संबंधांव्यतिरिक्त आशिया आणि युरोपमधील कनेक्टिव्हिटीसाठी हे एक महत्त्वाचे केंद्र असल्याचे वर्णन केले होते. मात्र युरोपातील बंदरांच्या अधिग्रहणात भारतापेक्षाही अदानी समूहाला कसा अधिक फायदा होईल यावर अधिक भर असल्याचं देखील म्हटलं जातंय.

ग्रीस बनू शकते युरोपचे प्रवेशद्वार

उत्तर ग्रीसमधील कावाला हे पूर्व मॅसेडोनिया प्रदेशातील प्रमुख बंदर आहे. मात्र, भारतासाठी युरोपचे प्रवेशद्वार म्हणून काम करण्यासाठी त्याचा विस्तार करावा लागणार आहे. जर भारताने एक किंवा अधिक बंदरे ताब्यात घेतली तर ग्रीस अधिकृतपणे युरोपसाठी भारताचे प्रवेशद्वार बनेल. यामध्ये अदानी ग्रुपला प्रचंड फायदा होईल, तसेच भारतात निर्यातीत चौथ्या स्थानी घसरलेल्या गुजरात राज्याला देखील यामधून मोठा फायदा होईल असं देखील या घडामोडीतून स्पष्ट होतंय.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Adani Group will acquire port in Greek after PM Narendra Modi’s recent visit 27 August 2023.

हॅशटॅग्स

#Adani Group(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x