16 June 2024 1:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Card Limit | क्रेडिट कार्ड वापरताना करू नका या 5 चुका, अचानक क्रेडिट कार्ड लिमिट कमी होईल Property Knowledge | भावांनो! तुमची बहीण विवाहित असो वा अविवाहित, वडिलोपार्जित मालमत्तेत असतो 'इतका' हक्क HAL Share Price | HAL स्टॉक चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी सोडू नका Adani Port Share Price | मल्टिबॅगर अदानी पोर्ट्स शेअरची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार BCL Industries Share Price | शेअर प्राईस ₹57, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, शॉर्ट टर्ममध्ये ₹95 वर पोहोचणार SBI Mutual Fund | SBI योजनेत महीना रु.5000 बचत, मुलांच्या शिक्षण ते लग्नकार्यावेळी 55 लाख रुपये मिळतील My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून EPF कापला जातो? पहिलं स्कीम सर्टिफिकेट मिळवा, अन्यथा पेन्शन विसरा
x

HCL Share Price | HCL टेक्नॉलॉजी स्टॉक चार्टवर मजबूत तेजीचा पॅटर्न तयार, तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस किती?

HCL Share Price

HCL Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मात्र गुंतवणूकदारांच्या अपेक्षेप्रमाणे आयटी क्षेत्रामध्ये याचा काही परिणाम पाहायला मिळत नाहीये. आयटी क्षेत्र अजूनही कुठेतरी हा रॅलीमध्ये सहभागी होऊ शकला नाहीये. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कोणत्याही आयटी कंपनीने मार्च तिमाहीमध्ये प्रभावी निकाल सादर केले नाही. त्यामुळे आयटी कंपन्यांच्या शेअरच्या किमती अजूनही खालीच आहेत. ( एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनी अंश )

मात्र एचसीएल टेक्नॉलॉजी स्टॉक असाच एक स्टॉक आहे, जो बरेच दिवस अपट्रेंडमध्ये तेजीत धावत होता, परंतु मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केल्यावर शेअर्समध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला. आज गुरूवार दिनांक 23 मे 2024 रोजी एचसीएल टेक्नॉलॉजी स्टॉक 0.35 टक्के वाढीसह 1,347.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स फेब्रुवारी 2024 मध्ये 1697 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तिथून हा स्टॉक सतत घसरत 1300 रुपये किमतीवर आला आहे. एचसीएल स्टॉकमध्ये खालच्या स्तरावरून 1300 रुपये ते 1350 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. आता या स्टॉकने चार्टवर मजबूत तेजीचा पॅटर्न तयार केला आहे. एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स मंगळवारी 1341.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेड फर्मच्या तज्ञांच्या मते, “एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स विक्रमी उच्चांकावरून खाली आल्यावर कंसोलिडेशन दर्शवत आहे. सध्या हा स्टॉक मागील कंसोलिडेशन श्रेणीच्या नेकलाइन झोनच्या सपोर्ट किमतीच्या जवळ ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते, एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1590 रुपये किंमत स्पर्श करू शकतात”.

एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीचा RSI 35 च्या आसपास आहे. म्हणजेच स्टॉक ओव्हरसोल्ड झोनमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. मागील काही दिवसांत या शेअरला मोठ्या विक्रीच्या दबावाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हा स्टॉक 1300 रुपये किंमत पातळीवर सपोर्ट तयार करून तेजीत वाढू शकतो. दैनंदिन चार्टवर नजर टाकली तर आपल्याला समजेल की, हा स्टॉक 1400 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार तयार करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HCL Share Price NSE Live 23 May 2024.

हॅशटॅग्स

HCL Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x