 
						Texmaco Rail Share Price | टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. आज मात्र या स्टॉक मध्ये किंचित प्रॉफिट बुकींग होत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढीसह 149.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
शेअरची 52 आठवड्यांची पातळी
मागील आठवड्यात शुक्रवारी टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर 131.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 40.49 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 1.52 टक्के घसरणीसह 146.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
गुंतवणुकीवर परतावा
टेक्समको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 390 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 ऑगस्ट 2021 रोजी टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 29.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 ऑगस्ट 2023 रोजी टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 149.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
जर तुम्ही 2 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 लाख रुपये झाले असते. मागील 6 महिन्यांत टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 235 टक्के परतावा कमावून दिला आहे.
28 फेब्रुवारी 2023 रोजी टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 44.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 149.40 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत 24 टक्के वाढली आहे.
टेक्समँको रेल आणि हिंदाल्को इंडस्ट्रीज या दोन्ही कंपन्यांनी नुकताच एक जागतिक दर्जाच्या अॅल्युमिनियम रेल्वे वॅगन आणि डबे विकसित करण्यासंबंधित धोरणात्मक करार संपन्न केला आहे. यामुळे भारतीय रेल्वेला आपली विकासात्मक उद्दिष्टे प्राप्त करण्यात मोठी मदत होणार आहे. या भागीदारी अंतर्गत भारतामध्ये जागतिक दर्जाचा रेल्वे डबे उत्पादन करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		