15 December 2024 3:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Nirmala Sitharaman on Bad Bank | बँकिंग क्षेत्रासाठी केंद्राकडून ३०,६०० कोटींच्या तरतुदीची घोषणा

bad bank

नवी दिल्ली, १४ सप्टेंबर | देशात करोना काळामध्ये मोठं आर्थिक संकट निर्माण झालं. अजून देखील देशातील अनेक सामाजिक घटक करोनामुळे बसलेल्या आर्थिक फटक्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आधीच तोट्यात असणाऱ्या बँकांची अजूनच वाईट अवस्था झाली. यामुळे काही बँकांना टाळं लागण्याची देखील वेळ ओढवली. त्यामुळे देशातील एकूण आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय़ घेतला आहे.

Nirmala Sitharaman on Bad Bank, बँकिंग क्षेत्रासाठी केंद्राकडून ३०,६०० कोटींच्या तरतुदीची घोषणा – Union Finance minister Nirmala Sitharaman announces over rupees 30 thousand crore guarantee for bad bank :

बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने बँकिंग क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामार्फत संकटात असलेल्या बँकिंग क्षेत्रासाठी तब्बल ३० हजार ६०० कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे.

शिवाय अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या सहा वर्षांमध्ये बँकांद्वारे ५,०१,४७९ लाख कोटी रूपयांची वसुली करण्यात आली. निव्वळ मालमत्तेच्या रिट-ऑफमध्ये ९९,९९६ कोटी रूपये वसूल केल्याचंही त्यांनी सांगितलं. नॅशनल असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड म्हणजेच NARCL बँकांच्या बॅलन्स शीटमध्ये एनपीए एकत्र करेल आणि त्यांचे व्यावसायिक व्यवस्थापन करेल, तसंच त्यावर तोडगा काढेल असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

NARCL सोबत आम्ही एक इंडिय डेब्ट रिझॉल्युशन कंपनी लिमिटेडचीही स्थापना करणार आहोत. बँका आज त्वरित सुधारणा कारवाईतून बाहेर येण्यास सक्षम आहेत. बँकांनादेखील नफा होत आणि बाजारातूनही पैसा मिळत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Union Finance minister Nirmala Sitharaman announces over rupees 30 thousand crore guarantee for bad bank.

हॅशटॅग्स

#BadBank(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x