
Mishtann Foods Share Price | मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 12.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यात मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 56 टक्के नफा मिळवून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी मिष्ठान्न फूड्स शेअर्स 5.57 टक्के वाढीसह 14.98 रुपये (BSE सकाळी 09:22 वाजता) किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील 5 वर्षांत मिष्टान फूड्स कंपनीचे शेअर्स 3 रुपये वरून वाढून 13 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1027 कोटी रुपये आहे. मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परकी किंमत 14.72 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 7.09 रुपये होती. 28 मे 2021 रोजी मिष्टान फूड्स कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीवरून आतापर्यंत मिष्टान फूड्स कंपनीचे शेअर्स तब्बल 700 टक्के वाढले आहे.
सध्या शेअर बाजारातून मिष्टान फूड्स कंपनी बाबत एक मोठी अपडेट येत आहे. मिष्टान फूड्स कंपनीच्या संचालक मंडळाने मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअर धारकांना राइट्स इश्यू करण्यास मंजुरी दिली आहे. मिष्टान फूड्स कंपनी आपल्या शेअर धारकांना 50 कोटी रुपये मूल्याची राइट्स इश्यू जारी करणार आहे. सध्या कंपनीने राइट्स इश्यूबद्दल सेबीला कळवले नाहीये, मात्र लवकरच कंपनी सेबी कडे माहिती सादर करेल आणि त्यात राईट इश्यूची किंमत, रेकॉर्ड तारीख, इश्यू उघडण्याची तारीख, बंद होण्याची तारीख, गुणोत्तर सर्व तपशील दिले जातील.
मिष्टान फूड्स कंपनी पुढील काळात क्रिस्टल सॉल्ट आणि रॉक सॉल्ट बाजारात लाँच करण्याची तयारी करत आहे. यासह कंपनी आपली FMCG उत्पादने भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये देखील लॉन्च करण्याची योजना आखत आहे. यामुळे कंपनीच्या नफ्यात नक्की वाढ होईल. मिष्टान फूड्स लिमिटेड ही कंपनी बासमती तांदळाच्या विविध प्रकाराचे खरेदी विक्री करणारी भारतातील अग्रणी FMCG कंपनी मानली जाते.
मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत मागील वर्षीच्या तुलनेत 85 टक्के वाढीसह 294 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. त्याचप्रमाणे मिष्टान फुड्स कंपनीने जून तिमाहीत 525 टक्के वाढीसह 69 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.