
Praj Industries Share Price | प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड या इथेनॉल सोल्यूशन संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे. या कालावधीत प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना 535 टक्के नफा कमावून दिला आहे. प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 28 ऑगस्ट 2020 रोजी 74.9 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि 3 वर्षांनंतर म्हणजेच 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 475.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 2 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 40.7 टक्के परतावा कमावून दिला आहे. आणि मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 490.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवार दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के वाढीसह 482.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
चालू आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 475.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 29 ऑगस्ट 2022 रोजी हा स्टॉक 406.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 514 रुपये होती. नीचांकी किंमत पातळी 299 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9,074.51 कोटी रुपये आहे. जून 2023 च्या तिमाहीत प्राज इंडस्ट्रीज कंपनीने 58.7 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
मागील वर्षी जून तिमाही कालावधीत कंपनीने 41.3 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीने 748.8 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी जून तिमाहीत कंपनीने 735.4 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने नफा जून तिमाहीत 75.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 55.9 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी मुख्यतः बायो टेक्नॉलॉजी क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी इथेनॉल उत्पादन करण्याचे काम देखील करते. प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी जगातील एकूण इथेनॉल उत्पादनाच्या 10 टक्के इथेनॉल उत्पादन करते. कंपनीच्या बिझनेस श्रेणीमध्ये बायोएनर्जी प्राज हायप्युरिटी सिस्टीम्स, क्रिटिकल प्रोसेस इक्विपमेंट अँड स्किड्स, सांडपाणी प्रक्रिया आणि मद्यनिर्मिती आणि पेय निर्मिती देखील सामील आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.