
IRFC Share Price | गेल्या वर्षभरात शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली आहे. खासगी कंपन्यांबरोबरच सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्येही गुंतवणूकदारांनी भरघोस कमाई केली. गुंतवणूकदारांना नफा देणाऱ्या या शेअर्समध्ये सरकारी रेल्वे कंपन्यांसह ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचाही समावेश आहे, ज्यांनी गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना ३२० टक्के परतावा दिला आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी (०४ सप्टेंबर) सुद्धा IRFC शेअर 16.41 टक्के (NSE) तेजीसह 64.90 रुपयांवर ट्रेड करत आहे.
आयआरएफसी शेअरची सध्याची स्थिती
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या (आयआरएफसी) व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी 50.16 रुपये खुला भाव आणि 49.83 रुपये बंद भाव दिसून आला. काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी (०४ सप्टेंबर) सुद्धा IRFC शेअर 13.54 टक्के (NSE सकाळी ९:४५) तेजीसह 63.30 रुपयांवर ट्रेड करत होता. तर आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (०५ सप्टेंबर) सुद्धा IRFC शेअर 7.50 टक्के (NSE) तेजीसह 71.70 रुपयांवर ट्रेड करत आहे. हा शेअर 50.5 रुपयांच्या उच्चांकी आणि 49.77 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. आयआरएफसीचे बाजार भांडवल 65,616.97 कोटी रुपये आहे.
मल्टिबॅगर आयआरएफसी शेअर
आयआरएफसी देखील थेट रेल्वेशी जोडलेली आहे. त्याचे पूर्ण नाव इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आहे. गेल्या वर्षभरात 154 टक्के परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 99 टक्क्यांनी वधारला आहे. शुक्रवारच्या सत्रात हा शेअर 56.25 रुपयांवर बंद झाला होता.
शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर
शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 52.71 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 20.55 रुपये आहे. शुक्रवारी बीएसईवर एकूण 4,889,774 शेअर्सचे व्यवहार झाले.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.