16 May 2024 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारातून बचत करा! SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' योजना मालामाल करतील, बचत अवघी रु. 500 Post Office Scheme | मोठी कमाई करा! या योजनेत 500 रुपयांची बचत सुरु करा, मिळेल 9,76,370 रुपये परतावा Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय
x

Brightcom Share Price | सुपर मल्टिबॅगर ब्राइटकॉम ग्रुप शेअरची घसरण सुरू, सलग 8 दिवसांपासून लोअर सर्किट, पुढे काय होणार?

Brightcom Share Price

Brightcom Share Price | गेल्या काही दिवसांत ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअरमध्ये (Brightcom Group share price) मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांच्या (Brightcom Share) घसरणीनंतर १६.०८ रुपयांवर बंद झाला. सलग आठव्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये (Brightcom Group Share) लोअर सर्किट आहे. ब्राइट कॉम ग्रुपच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचं प्रमुख कारण म्हणजे सेबीचा निर्णय. (Brightcom Group)

सध्या शेअर्सची किंमत?

शुक्रवारी ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअरची 5.00 टक्क्यांनी घसरण (Brightcom share price NSE) होऊन सध्या शेअर 16.15 रुपयांवर ट्रेड करत आहे. तर बीएसई’वर शेअर 4.96 टक्क्याने घसरून (Brightcom share price BSE) 16.08 रुपयांवर ट्रेड करत होता. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी (०४ सप्टेंबर) सुद्धा ब्राइटकॉम ग्रुप शेअर 4.95 टक्के (NSE सकाळी ९:४५) घसरणीसह 15.35 रुपयांवर ट्रेड करत आहे.

ब्राइटकॉमच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे कारण काय?

बाजार नियामक सेबीने कंपनीचे प्रवर्तक, एमडी सुरेश कुमार रेड्डी, सीएफओ नारायण राजू यांना पुढील आदेशापर्यंत पदावरून हटवले आहे. याशिवाय सेबीने ज्येष्ठ गुंतवणूकदार शंकर शर्मा यांच्यासह अन्य २१ जणांना शेअर्स विक्रीवर बंदी (Brightcom Group news) घातली आहे. जून 2023 तिमाहीपर्यंत शंकर शर्मा यांच्याकडे ब्राइटकॉममध्ये 2.30 कोटी शेअर्स होते.

याशिवाय सेबीने प्रवर्तकांना ४० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एप्रिल 2020 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत सेबीला कंपनीला शेअर्सची खरेदी-विक्री करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बाजार नियामकाला असा कठोर निर्णय घ्यावा लागला. (Brightcom group ltd Share Price)

शेअर्सची विक्री वाढत आहे

ब्राइटकॉम समूहाच्या शेअरमध्ये १७ ऑगस्ट २०२३ पासून सातत्याने घसरण होत आहे. गुंतवणूकदारांमध्ये शेअर्स विकण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. या एका बातमीमुळे कंपनीने शेअर बाजारातील गुंतवणूकदार वर्गाचा विश्वास गमावला आहे. आता परिस्थिती अशी आहे की, १७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२३ या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये ४० टक्क्यांची घसरण झाली आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Brightcom Share Price on 04 September 2023.

हॅशटॅग्स

Brightcom Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x