
IRFC Share Price | मागील आठवड्यात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळाली होती. अशीच तेजी आज देखील पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात BHEL कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 29 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर IRFC कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15.19 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या एका आठवड्यात भेल कंपनीच्या शेअरची किंमत 105 रुपये या नीचांक किंमत पातळीवरून वाढून 137.10 रुपये किमतीवर पोहचली होती.
आज सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 17.04 टक्के वाढीसह 65.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आणि भेल कंपनीचे शेअर्स आज 1.10 टक्के वाढीसह 137.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
IRFC दुप्पट परतावा
मागील एका आठवड्यात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 48.05 रुपये या किमतीवरून वाढून 56.50 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15.50 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 42 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा कमावून दिला आहे.
या कालावधीत लोकांचे पैसे 97.37 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 156.26 टक्के वाढली आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 20.80 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 56.50 रुपये होती.
BHEL शेअर इतिहास
BHEL कंपनीच्या शेअरने मागील 5 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना 27 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. महिल एका महिन्यात हा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 34.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत BHEL कंपनीचे शेअर्स 81.15 टक्के मजबूत झाले आहेत. मागील एका वर्षात भेल कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 128.50 टक्के परतावा कमावून दिला आहे.
या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 137.10 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 54.75 रुपये होती. शेअर बाजारातील 21 पैकी 15 तज्ञांनी BHEL कंपनीचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. तर 5 तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि एका तज्ञाने स्टॉक होल्ड करण्याची शिफारस केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.