27 July 2024 10:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

SBI Nation First Transit Card | एसबीआय बँक ग्राहकांसाठी महत्वाची अपडेट! प्रवासाचा अनुभव बदलणार, खास कार्ड लाँच

SBI Nation First Transit Card

SBI Nation First Transit Card | सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ‘नेशन फर्स्ट ट्रान्झिट कार्ड’ लाँच केले आहे. या कार्डमुळे ग्राहकाची बरीच सोय होते. यामुळे मेट्रो, बस आणि पार्किंग आदी ठिकाणी एकाच माध्यमातून सुलभ डिजिटल तिकीट भरता येणार आहे. एसबीआयने कार्ड सादर करण्याबाबत सांगितले की, ग्राहकांचे बँकिंग आणि दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

प्रवासाचा अनुभव बदलण्यास मदत होईल

नेशन फर्स्ट ट्रान्झिट कार्ड रुपे आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) तंत्रज्ञानावर काम करते. एसबीआयचे चेअरमन दिनेश कुमार खारा यांनी सांगितले की, हे कार्ड नॅशनल व‍िजन’सोबत सादर करण्यात आले आहे. यामुळे प्रवासाचा अनुभव बदलण्यास मदत होईल. ग्राहकांचे जीवन सुकर तर होईलच, शिवाय देशाच्या विकासातही हातभार लावणारे कार्ड सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो.

आतापर्यंत कोणती कार्डे लाँच करण्यात आली

एसबीआयने म्हटले आहे की एमएमआरसी मेट्रो लाइन 3 आणि आग्रा मेट्रोमध्ये एनसीएमसी आधारित तिकीट सोल्यूशन देखील लागू केले जात आहे. ते लवकरच जनतेसाठी उपलब्ध होणार आहे. एसबीआयने २०१९ मध्ये ट्रान्झिट ऑपरेटर्ससह एनसीएमसी प्रोग्राममध्ये प्रवेश केला. त्यानंतर एसबीआयने ‘सिटी १ कार्ड’, ‘नागपूर मेट्रो एमएचए कार्ड’, ‘मुंबई १ कार्ड’, ‘गोस्मार्ट कार्ड’ आणि ‘सिंगारा चेन्नई कार्ड’ लाँच केले.

एसबीआय ही देशातील सर्वात मोठी मॉर्गेज लोन बँक आहे. बँकेचा गृहकर्जाचा पोर्टफोलिओ ६.५३ लाख कोटी रुपयांहून अधिक झाला आहे. जून 2023 पर्यंत बँकेच्या ठेवींचा आधार 45.31 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. होम लोन आणि ऑटो लोनमध्ये एसबीआयचा मार्केट शेअर अनुक्रमे ३३.४% आणि १९.५% आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : SBI Nation First Transit Card Launched 10 September 2023.

हॅशटॅग्स

#SBI Nation First Transit Card(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x