15 December 2024 11:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा
x

Adani Green Share Price | मागील 1 महिन्यात 57 टक्के परतावा देणारा अदानी ग्रीन एनर्जी शेअर पुढेही मोठा परतावा देणार?

Adani Green Share Price

Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मात्र मागील एका आठवड्यात या कंपनीचा स्टॉक 4 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. मागील एका महिन्यात अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 57 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील तीन महिन्यांत अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 40 टक्क्यांनी वाढली आहे. तर मागील एका वर्षात अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 25 टक्क्यांनी खाली आली आहे. आज शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 0.085 टक्के वाढीसह 1,520.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, 26 डिसेंबर 2023 रोजी कंपनीच्या संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या या बैठकीत निधी उभारणीबाबत चर्चा होणार आहे.

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी पुढील एका वर्षात परिपक्व होणार्‍या डॉलर बाँड्सना पुनर्वित्त पुरवठा करण्यासाठी नवीन बाँड इश्यू करणार आहे. सिंगापूर स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने 410 दशलक्ष डॉलर्स भांडवल उभारण्याची घोषणा केली आहे.

8 डिसेंबर 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने सादर केलेल्या माहितीनुसार, अदानी ग्रीन एनर्जी कंपनी 500 दशलक्ष डॉलर्स पुनर्वित्त पुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या सर्व अटीची पूर्तता करत आहे. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे बाँड 10 डिसेंबर 2024 रोजी परिपक्व होणार आहेत.

2023 या वर्षाच्या सुरुवातीला यूएस शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर कॉर्पोरेट फसवणुक आणि गैरप्रकार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गौतम अदानी यांच्या सर्व कंपन्यांचे शेअर क्रॅश झाले होते. मात्र अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

हिंडनबर्ग फर्मच्या जानेवारी 2023 च्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर अदानी समुहाच्या अधिकार्‍यांनी आपल्या गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्यासाठी विविध निवेदने जाहीर केली, आणि आवश्यक ती सर्व पावले उचलली होती. यात अदानी समूहाने आपले सर्व कर्जाची परतफेड करण्याचा आणि बाँड बायबॅक करण्यासारखी पावले उचलली आहेत. मागील आठवड्यात अदानी ग्रीन कंपनीने अक्षय ऊर्जा प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तब्बल 1.4 अब्ज डॉलर्स कर्ज उभारले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Green Share Price NSE 22 December 2023.

हॅशटॅग्स

#Adani Green Share Price(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x