1 June 2024 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

RVNL Share Price | मालामाल शेअर! RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या वेगात, तज्ज्ञांच्या मते शेअर आणखी वाढणार, टार्गेट प्राईस पाहून विचार करा

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. रेल विकास निगम लिमिटेड ही कंपनी भारत सरकारच्या मालकीची आहे. मागील वर्षी 2 सप्टेंबर 2022 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 32.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मात्र कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 160 रुपये किमतीवर पोहचला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 18 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.59 टक्के वाढीसह 158.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारतात रेल्वे पायाभूत सुविधा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात सेन्सेक्समध्ये फक्त 11.27 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत होते. तर आज देखील हा शेअर मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर 18 टक्क्यांच्या वाढीसह 163.45 रुपये या आपल्या इंट्राडे उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 28,000 कोटी रुपये आहे. सध्या ही कंपनी भारतील रेल्वे क्षेत्रातील पायाभूत विकास स्संबंधित मोठ मोठे प्रकल्प हाताळत आहे. शेअर बाजारांतील तज्ञांनी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.

तज्ज्ञांच्या मते पुढील काळात हा स्टॉक 179 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. पुढील काही दिवसात या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी तेजी पाहायला मिळेल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. मागील 3 वर्षांत रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 500 टक्के वाढवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| RVNL Share Price today on 5 September 2023

हॅशटॅग्स

RVNL Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x