21 May 2024 12:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Yes Bank Share Price | येस बँक थकीत कर्जाची वसुली करणार, आज येस बँक शेअरमध्ये मजबूत तेजी, डिटेल्स नोट करा

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँक स्टॉक सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीसह ट्रेड करत होता. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवारी येस बँक स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 19 रुपये या आपल्या 7 महिन्यांतील सर्वोच्च किंमत पातळीवर ट्रेड करत होता. तथापि नंतर विक्रीचा दबाव वाढल्याने येस बँक स्टॉक 7.49 टक्के वाढीसह 18.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी येस बँकेचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 0.83 टक्के घसरणीसह 18.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 3.06 टक्के वाढीसह 18.55 रुपये (NSE सकाळी ९:३० वाजता) किमतीवर ट्रेड करत आहे.

काही दिवसांपूर्वी येस बँक आणि सुभाष चंद्रा यांची एस्सेल ग्रुप मधील दोन वर्षांपासून सुरू असलेला आर्थिक खटला संपणार असल्याची माहिती मिळाली. जेसी फ्लॉवर्स अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने सुभाष चंद्र यांच्या एस्सेल ग्रुपसोबत 6,500 कोटी रुपये थकित कर्जाबाबत करार करण्याची घोषणा केली आहे. जेसी फ्लॉवर्स अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी ही येस बँक अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीची सहयोगी कंपनी म्हणून काम करते.

या करारानुसार जेसी फ्लॉवर्स फर्मने थकीत कर्जाच्या रकमेत 75 टक्के कट ऑफ देण्यास सहमती दर्शवली आहे. म्हणजेच आता ऍक्सेस ग्रुपला थकीत कर्ज्याच्या पोटी 6,500 कोटी रुपये ऐवजी 25 टक्के म्हणजेच 1,500 कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत. थकीत कर्जां पोटी सुभाष चंद्रा यांच्या ताब्यात घेण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये डिश, झी-लर्न आणि दिल्लीतील एका बंगल्याचा समावेश आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कर्जाच्या सेटलमेंटच्या अटींनुसार, सुभाष चंद्रा यांना 15 टक्के पेमेंट पहिल्या 30 दिवसांत करावे लागणार आहे. उर्वरित 85 टक्के रक्कम पुढील 6 महिन्यांत टप्प्याटप्प्यात भरण्याची मुभा देण्यात आली आहे. जेसी फ्लॉवर्स एआरसी फर्मने यापूर्वी येस बँकेकडून सवलतीच्या दराने NPA खरेदी केले होते.

डिसेंबर 2022 केलेल्या करारानुसार जेसी फ्लॉवर्स एआरसी फर्मने येस बँकेचे 11183 कोटी रुपये देऊन 48,000 कोटी रुपये मूल्याचे NPA खरेदी केले होते. मागील एका महिन्यात येस बँक स्टॉकची किंमत 10.36 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. YTD आधारे येस बँक स्टॉकची किंमत 13.86 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. तर मागील एका वर्षात येस बँक स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 7.46 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price today on 07 September 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x