
IRFC Vs Titagarh Share Price | टिटागड रेल सिस्टीम्स या रेल्वेसाठी वस्तू बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. कंपनीने नुकताच आपली लाभांशाची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या शेअर धारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी 22 सप्टेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे.
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2.14 टक्क्यांच्या वाढीसह 807 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 10,255.08 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 2.36 टक्के वाढीसह 825.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
शेअर्सची कामगिरी
टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा कमवून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 225 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरने लोकांना 255 टक्के परतावा कमावून डोळा आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावून 415 टक्के परतावा कमावला आहे.
मागील तीन वर्षांत टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1720 टक्के नफा कमावून दिला आहे. 30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीने 914.65 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील तिमाहीमध्ये कंपनीने 981.20 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. म्हणेजच या जून तिमाहीत कंपनीच्या महसूल संकलनात 6.78 टक्के घट पाहायला मिळाली आहे. जून तिमाही कालावधीत टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीने 61.78 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.