19 May 2024 9:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Jiwanram Sheoduttrai Industries IPO | अल्पावधीत कमाई होणार? IPO शेअरची प्राईस बँड 23 रुपये, पहिल्याच दिवशी 53 टक्के परतावा मिळणार

Jiwanram Sheoduttrai Industries IPO

Jiwanram Sheoduttrai Industries IPO | नुकताच जीवनराम श्योदुत्तराय इंडस्ट्रीज कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी ओपन करण्यात आला होता. जीवनराम शेओदुत्तराय इंडस्ट्रीज कंपनीचा IPO शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 ते मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 23 रुपये निश्चित करण्यात आली होती.

गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जातील. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 12 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. इशू किमत आणि ग्रे मार्केट किंमत पाहता हा स्टॉक 35 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. आणि स्टॉक लिस्टिंगवर पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना 53 टक्के नफा मिळू शकतो.

जीवनराम श्योदुत्तराय इंडस्ट्रीज कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता. तिसऱ्या दिवशी IPO 111.86 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणुकदारांसाठी राखीव ठेवलेला कोटा 149.32 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 69.70 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. जीवनराम श्योदुत्तराय इंडस्ट्रीज कंपनीचा IPO पहिल्या दिवशी 6.03 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर दुसऱ्या दिवशी हा IPO 36.73 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

जीवनराम श्योदुत्तराय इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या IPO मध्ये 17.07 कोटी रुपये मूल्याचे 74,22,000 फ्रेश इक्विटी शेअर्सचा जारी केले आहेत. या IPO मध्ये कंपनीने ऑफर फॉर सेल अंतर्गत स्टॉक जारी केले नाही. प्रत्येक इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य 10 आहे. जीवनराम श्योदत्ताराय इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 6,000 शेअर्स जारी केले होते.

कंपनीच्या प्रवर्तक गटाकडे कंपनीचे 99.996 टक्के भाग भांडवल आहेत. या IPO नंतर प्रवर्तक समुहाकडे फक्त 70.01 टक्के भाग भांडवल शिल्लक राहील. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे IPO शेअर्स गुंतवणूकदारांना वाटप केले जाईल. जीवनराम श्योदत्ताराय इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध होतील.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jiwanram Sheoduttrai Industries IPO on 13 September 2023.

हॅशटॅग्स

Jiwanram Sheoduttrai Industries IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x