25 April 2024 3:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी
x

Bank FD Vs Bank Shares | होय! या सरकारी बँकांचे शेअर्स FD पेक्षा 10 पट जास्त परतावा देतं आहेत, इथे पैसा वाढवा

Bank FD Vs Bank Shares

Bank FD Vs Bank Shares | भारतीय शेअर बाजारात या आठवड्यात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे, म्हणून बँक निफ्टी आणि पीएसयू बँक निफ्टी ही लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. स्टॉक मार्केटमध्ये घसरण असूनही, सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांचे शेअर्स अप्रतिम कामगिरी करत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, यांसारखे सरकारी बँकेचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. तर UCO बँक, IOB, बँक ऑफ महाराष्ट्र, PNB, PSB, बँक ऑफ इंडिया, आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या सरकारी मालकीच्या बँकेचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. मात्र काल पूर्ण बँकिंग सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता.

PSU बँकेच्या शेअरमधून पैशांचा पाऊस :
गेल्या एका महिन्यात PSU बँकेच्या शेअर्समध्ये पैसे लावणाऱ्या लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट झाले आहे. काल दुपारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 12:20 वाजण्याच्या सुमारास इंडियन ओव्हरसीज बँकचे शेअर्स 9 टक्के वाढीसह तर युको बँकेचे शेअर्स 7.50 टक्के वाढीसह आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स 3.52 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. पीएनबी बँकेच्या शेअर्समध्येही 2.53 टक्के आणि PSB बँकेच्या शेअर्समध्ये 2.22 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँकचे शेअर्स देखील हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते, मात्र कालची तेजी आज पूर्णतः नाहीशी झाली आहे. आज वरील सर्व बँकेचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. आज ट्रेडिंग सेशन सुरू होताच मार्केटमध्ये पडझड झाली, आणि परिणाम स्वरूप PSU बँकेचे शेअर्स देखील लाल निशाणीवर आले.

PSU बँकेच्या शेअर्सची कामगिरी :
गेल्या एक महिन्याभरात सरकारी बँकांच्या शेअर्सनी लोकांना चांगली कमाई करून दिली आहे. यामुळे शेअर बाजारातील अनेक गुंतवणूकदार PSU बँकेच्या शेअर्स कडे आकर्षित झाले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांना PSU बँकेच्या शेअर्सवर मत आहे की, ” बहुतांश PSU बँकांनी चालू आर्थिक वर्षाच्या Q2 मध्ये मजबूत नफा कमावला आहे. आणि बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता ही सुधारली आहे. सोबत क्रेडिट वाढीत वाढ झाली असून, या सर्व घटकांचा सकारात्मक परिणाम PSU बँकेच्या शेअर्स वर पाहायला मिळाला आहे”.

स्टॉक मार्केट तज्ञांचे निरीक्षण :
बँकिंग सेक्टर मधील शेअर्स मध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, FII आणि म्युचुअल फंड, संस्थात्मक गुंतवणूकदारांची आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणूकीचा ओघ वाढत आहे. बँकिंग क्षेत्रातील मजबूत पत वाढीचा दृष्टीकोन बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणूक वाढण्यास हातभार लावत आहे. डिसेंबर 2020 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शेअर्समध्ये म्युच्युअल फंडांची एकूण होल्डिंग 1 टक्के होती. मात्र सप्टेंबर तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँक शेअर्समध्ये म्युच्युअल फंडांची होल्डिंग 3.6 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्याच वेळी मॉर्गन स्टॅनले ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हंटले आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी चांगले प्रदर्शन केले असून पुढील तिमाहीतही ही कामगिरी कायम राहील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Bank FD Vs Bank Shares has increased in past few months and given huge returns to shareholders on 16 December 2022.

हॅशटॅग्स

#Sarkari Shares(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x