
RVNL Vs Titagarh Rail Share | टिटागढ रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 3 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पहायला मिळाला आहे. रेल्वे कोच आणि वॅगन निर्मात्या कंपनीच्या शेअरबाबत दिलेल्या सकारात्मक वाढीच्या दृष्टिकोनामुळे टिटागढ रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स वाढत होते.
एचएसबीसी सिक्युरिटीज फर्मने टिटागढ रेल सिस्टीम कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 2023 या वर्षात टिटागढ रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स 64 टक्के मजबूत झाले आहेत.
ब्रोकरेज फर्मने सध्याच्या किंमत पातळीवरून स्टॉक वाढीचा अंदाज व्यक्त केला असून टिटागढ रेल सिस्टीम स्टॉकवर 900 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी टिटागढ रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स 1.55 टक्के घसरणीसह 767.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
आर्थिक वर्ष 2023-26 मध्ये टिटागढ रेल सिस्टीम कंपनीच्या निव्वळ नफ्यात 2.8 पट वाढ होण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, टिटागढ रेल सिस्टीम कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये अनेक मोठे ऑर्डर्स सामील आहेत. त्यामुळे या कंपनीच्या वाढीचा दृष्टीकोन अधिक मजबूत होतो.
टिटागढ रेल सिस्टीम कंपनीच्या रेल्वे वॅगनला जोरदार मागणी प्राप्त होत आहे. म्हणून तज्ञांनी आर्थिक वर्ष 2023-26 या काळात कंपनीच्या नफ्यात 2.8x वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. याकाळात टिटागढ रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स सरासरी वार्षिक 20 टक्के दराने वाढू शकतात.
जून 2023 तिमाहीत टिटागढ रेल सिस्टीम कंपनीने 62 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीने जून 2023 तिमाहीत 911 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून 2023 तिमाहीत मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात 110.87 टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे.
जून 2023 तिमाहीत टिटागढ रेल सिस्टीम कंपनीने 62 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून तिमाहीमध्ये कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 300 बेसिस पॉइंट्स वाढीसह YOY आधारे 12 टक्क्यांनी वाढला आहे.
टिटागढ रेल सिस्टीम ही कंपनी मुख्यतः रेल्वे वॅगन, डबे आणि त्यांच्याशी संबंधित घटक बनवण्याचे काम करते. मागील एका आठवड्यात टिटागढ रेल सिस्टीम कंपनीच्या शेअरमध्ये 3.32 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18.59 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात टिटागढ रेल सिस्टीम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 386.40 टक्के परतावा कमावून दिला आहे. टिटागढ रेल सिस्टीम कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 867.70 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 135.80 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.