
Shakti Pumps Share Price | शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील काही महिन्यापासून या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आता शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीला 2 राज्य सरकारांनी मोठ्या ऑर्डर दिल्या आहेत. म्हणून या कंपनीच्या शेअरमध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे.
मागील 6 महिन्यांत शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या कंपनीला यूपी सरकार आणि हरियाणा सरकारने पीएम कुसुम योजने अंतर्गत मोठ्या ऑर्डर दिल्या आहेत. आज बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.01 टक्के वाढीसह 868.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
चालू आठवड्यात सोमवारी शक्ती पंप कंपनीचे शेअर्स 856.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. विविध राज्य सरकारांकडून नवीन ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या बाजार भांडवलमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळाली आहे. शक्ती पंप इंडिया कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 21.11 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 927.70 रुपये होती. तर नीचांकी किंमत पातळी 381.00 रुपये होती.
मागील 6 महिन्यांत शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 108.32 टक्के म्हणजेच 445.10 रुपये वाढली आहे. जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 5 लाख रुपये लावले असते, तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10 लाखांपेक्षा जास्त झाले असते. 20 मार्च 2023 रोजी कंपनीच्या शेअर 410 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 111.46 टक्के नफा मिळवून दिला आहे.
शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1057 कोटी रुपये आहे. शक्ती पंप्स लिमिटेड कंपनीला प्रधानमंत्री कुसुम-3 योजनेअंतर्गत यूपी सरकारच्या कृषी विभागाने 10,000 पंप पुरवण्याची ऑर्डर दिली आहे. यूपी सरकारने दिलेल्या या ऑर्डरचे एकूण मूल्य 293 कोटी रुपये आहे.
शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीला केंद्राच्या पीएम-कुसुम-III योजने अंतर्गत उत्तर प्रदेश सरकारच्या कृषी विभागाने एक कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. या ऑर्डरनुसार, शक्ती पंप्स इंडिया कंपनीला सोलर वॉटर पंपिंग सिस्टिमचा पुरवठा करण्याचे आणि इन्स्टॉलेशन व त्याला चालू करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीला ही वर्क ऑर्डर जारी झाल्यापासून 90 दिवसांच्या आत पूर्ण करण्याची आहे. यासह हरियाणा राज्य सरकारने देखील शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. कुसुम-3 योजनेंतर्गत हरियाणा राज्य सरकारने शक्ती पंप कंपनीला 7781 पंपांची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 358 कोटी रुपये आहे.
शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या स्टॉकचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक म्हणजेच RSI 53.2 अंकावर असून तो ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाहीये. शक्ती पंप कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग अॅव्हरेज किमतीच्या वर ट्रेड करत आहेत. शक्ती पंप कंपनीने आपल्या जून 2023 तिमाहीमध्ये 113 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि त्यात कंपनीचा कार्यरत नफा 8.46 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड ही कंपनी विविध प्रकारच्या पंपांचे निर्मिती करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी सबमर्सिबल, सोलर, प्रेशर बूस्टर, कृषी आणि अशा अनेक प्रकारचे पंप बनवण्याचे काम करते. हे पंप मुख्यतः घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरले जातात. यासह शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनी जगभरात 100 विविध देशांमध्ये आपले पंप निर्यात करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.