Tata Power Share Price | पॉवर सेक्टर स्टॉकमध्ये जोरदार तेजी, विजेच्या वाढत्या मागणीचा फायदा टाटा पॉवर शेअरला होणार?

Tata Power Share Price | मागील काही महिन्यांपसून ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. यात टाटा पॉवर कंपनी सारख्या दिग्गज कंपनीचे शेअर्स देखील सामील आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे.
पॉवर सेक्टरमधील एनटीपीसी, जेएसडब्ल्यू एनर्जी, पीएफसी, आरईसी आणि एसजेव्हीएन यासारख्या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. आज मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर 1.36 टक्के वाढीसह 260.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील एका महिन्यात पॉवर इंडेक्समध्ये 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 31 ऑगस्ट 2023 रोजी संपूर्ण भारतात विजेची एकूण मागणी 236 GW पेक्षा जास्त विक्रमी पातळीवर पोहचली होती आणि 17 ऑगस्ट 2023 रोजी भारतात विजेची मागणी 234 GW होती. ऑगस्ट 2023 मध्ये शेवटच्या दोन आठवड्यात भारताची दैनंदिन विजेची मागणी सरासरी 233 GW होती. ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये होणारी वाढ ही वाढत्या वीजेच्या मागणीमुळे पाहायला मिळत आहे. यात YoY आधारे 16 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
भारतात एल निनोमुळे अनेक भागात कमी पाऊस झाला आहे. आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील काही भागात तर उष्णतेच्या लाटाची झळा बसली आहे. उत्पादन उद्योगातील वाढत्या मागणीमुळे मागील काही महिन्यांत विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विजेची पूर्तता करण्यासाठी भारत सरकारने काही गॅस आधारित वीज प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने कार्य करण्याची सूचना दिली होती.
पुढील काळात भांडवली खर्चातील वाढ, स्वच्छ हरित ऊर्जा निर्मितीवर लक्ष केंद्रित करणे, मजबूत ऑर्डर बुक यामुळे वीज कंपन्याच्या शेअरमध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते. सध्या शेअर बाजारातील बहुतांश पॉवर स्टॉक उच्चांक किमतीजवळ ट्रेड करत आहेत. आकर्षक किंमत आणि सातत्यपूर्ण लाभांश वाटप करणारे पॉवर स्टॉक दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अधिक आकर्षित करु शकतात.
नवीकरणीय ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमध्ये झालेली वाढ आणि विजेच्या मजबूत मागणीमुळे गुंतवणूकदारांनी पॉवर स्टॉकवर अधिक विश्वास व्यक्त केला आहे. ऊर्जा क्षेत्रात झालेली ही वाढ अक्षय ऊर्जेवर भर दिल्याने पाहायला मिळत आहे.
आकर्षक परतावा पाहून परकीय गुंतवणूकदार देखील भारतीय पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार गुंतवणूक करत आहेत. ईएसजी गुंतवणूकदार पैसे लावताना पर्यावरण, सामाजिक आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या समस्यांबाबत जागरूक असलेल्या कंपन्यांमध्ये किंवा क्षेत्रांमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देत असतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Power Share Price today on 26 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH