DroneAcharya Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत लाखोंचा परतावा देणाऱ्या ड्रोन आचार्य एरियल कंपनीला मोठी ऑर्डर, शेअर तेजीत येणार

DroneAcharya Share Price | मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.47 तक्के घसरणीसह 180 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 432 कोटी रुपये आहे. ड्रोन आचार्य एरियल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 243 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 96 रुपये होती.
मागील 1 महिन्यात ड्रोन आचार्य एरियल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 13 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 122 रुपयेवरून वाढून 180 रुपये किमतीवर गेली होती. या काळात कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 44 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 1 वर्षात ड्रोन आचार्य एरियल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 68 टक्के नफा कमावून दिला आहे. आता हा कंपनीचे शेअर्स पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, कंपनीला 12.6 लाख डॉलर्सचे नवीन काम मिळाले आहे. या ऑर्डरमध्ये कंपनीला ड्रोन आणि आयटी हार्डवेअरचा पुरवठा, ड्रोन डेटा अधिग्रहण आणि प्रक्रिया सेवा आणि निर्णय समर्थन प्रणाली संबंधित कामाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मध्यपूर्व आशियातील देश कतारमधील ट्रायकॉनिक्स इंडस्ट्रियल सोल्युशन्स कंपनीने ड्रोन आचार्य एरियल कंपनीला ही मोठी ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर देणारी कंपनी मुख्यतः तेल आणि वायू क्षेत्रात व्यवसाय करते. याआधी, ड्रोन आचार्य एरियल कंपनीने वूल स्टोन कॅपिटल SA सोबत फ्रँचायझी करार संपन्न केल्याची माहिती जाहीर केली होती.
ही स्वित्झर्लंड स्थित एक खाजगी गुंतवणूक होल्डिंग कंपनी आहे. या कराराचा मुख्य उद्देश भारतात ड्रोनच्या विक्रीला प्रोत्साहन देणे आणि 30 दूरस्थ पायलट प्रशिक्षण संस्था सुरू करणे हा आहे. यासाठी ड्रोन आचार्य कंपनी आणि वूलस्टोन यांच्यात 23 कोटी रुपयेचा करार झाला आहे.
ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीने काही दिवसांपूर्वी भुजंग नावाचे एक सुपर हाय अल्टीट्यूड लाँग रेंज ड्रोन हेवी लिफ्ट ऑफ ड्रोनचे अनावरण केले होते. या ड्रोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे, भुजंग हे भारतातील पहिले सुपर हाय अल्टिट्यूड मल्टी-रोटर मल्टी-रोल ड्रोन मानले जात आहे. हे ड्रोन 1500 मीटर उंचीपर्यंत भरारी घेऊ शकते. या ड्रोनचा सर्वोच्च टेक ऑफ पॉइंट 4800 मीटर उंची पर्यंत आहे.
ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन लिमिटेड या कंपनीची स्थापना 2017 साली झाली होती. ही स्मॉल कॅप कंपनी हाय एंड ड्रोन इकोसिस्टम निर्माण करते. आणि आपल्या ग्राहकांना ड्रोन सोल्यूशन्स, मल्टीसेन्सर ड्रोन सर्वेक्षण आणि डेटा प्रोसेसिंग इत्यादी सेवा प्रदान करण्याचे काम करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Drone Acharya Share Price today on 02 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH