
Stocks To Buy| मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. मात्र मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक किंचित खरेदी पाहायला मिळाली होती. BSE मिडकॅप इंडेक्स 1.2 टक्क्यांनी वधारला आहे. या वर्षी आतापर्यंत मिडकॅप इंडेक्समध्ये 28 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
सध्या शेअर बाजारात सुरू असलेल्या कमजोरीत कोणता स्टॉक खरेदी करावा याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून शेअरखान फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी 3 सर्वोत्तम मिडकॅप स्टॉक्सची निवड केली आहे, ज्यात तुम्ही पैसे गुंतवणूक करून भरघोस कमाई करू शकतात.
सनटेक रियल्टी :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 451 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ज्ञांनी या स्टॉकवर 600 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आणि 375 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.29 टक्के घसरणीसह 431.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्के आणि तीन महिन्यांत 60 टक्के नफा कमावून दिला आहे.
Pfizer :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3860 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ज्ञांनी या स्टॉकवर 6000 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आणि 2950 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 3918.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
CDSL :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1360 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ज्ञांनी या स्टॉकवर 1650 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आणि 1150 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.50 टक्के घसरणीसह 1317 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.