18 May 2024 10:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला
x

Advik Capital Share Price | होय! एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी कराल, किंमत 2 रुपये, यापूर्वी अल्पावधीत 800% परतावा दिला

Advik Capital Share Price

Advik Capital Share Price | अद्विक कॅपिटल कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 800 टक्के नफा कमावून दिला आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने आपल्या शेअर धारकांना राइट्स इश्यू लाभ देण्याची घोषणा केली होती. 11 ऑक्टोबर 2023 रोजी मर्चंट बँकरसोबत कंपनीच्या राइट्स इश्यू समितीची बैठक होणार होती.

या बैठकीत कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना 20.79 कोटी शेअर्स राइट्स इश्यू अंतर्गत जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी अद्विक कॅपिटल स्टॉक 1.59 टक्के घसरणीसह 2.48 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

अद्विक कॅपिटल कंपनीने आपले 1 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 2.40 रुपये प्रति शेअर किमतीवर राइट इश्यू अंतर्गत जारी करण्याची घोषणा केली आहे. या फायनान्स कंपनीच्या पेड अप कॅपिटलमध्ये आता 42.81 कोटी रुपयेची भर पडली आहे. 4 नोव्हेंबर 2020 रोजी अद्विक कॅपिटल स्टॉक 28 पैशांवर ट्रेड करत होता. या नीचांकी किमतीवरून हा स्टॉक 1000 टक्के वाढला आहे.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 1.6 टक्के घसरणीसह 2.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसांत अद्विक कॅपिटल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्के नफा कमावून दिला आहे.

अद्विक कॅपिटल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 109 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.1 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1.90 रुपये होती. 4 नोव्हेंबर 2020 रोजी अद्विक कॅपिटल स्टॉक 0.29 पैसे या नीचांक किंमत पातळीवरून 8 पट अधिक वाढला आहे.

अद्विक कॅपिटल ही एक नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना भाडेपट्टी, वित्त, गुंतवणूक आणि इतर कॉर्पोरेट भाडेपट्टीवर सल्ला देण्याचे काम करते. या कंपनीचा ग्राहक वर्ग फक्त भारतातच नाही तर जगभरात पसरला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Advik Capital Share Price BSE 13 October 2023.

हॅशटॅग्स

#Advik Capital Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x