18 May 2024 8:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

NBCC Share Price | फक्त 64 रुपयांचा एनबीसीसी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक अजून तुफान तेजीत येतोय, नेमकं कारण पहा

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स नुकताच आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंट्राडे ट्रेडमध्ये एनबीसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 64.45 रुपये किमितिवर ट्रेड करत होते. NBCC Share

मागील काही काळापासून एनबीसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळत होती, करत कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी एनबीसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.078 टक्के (NBCC Share Price NSE) घसरणीसह 63.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एनबीसीसी लिमिटेड कंपनीला विशाखापट्टणम बंदर प्राधिकरणाकडून ऑफिस ब्लॉकचे नूतनीकरण करण्याचे काम देण्यात आले आहे. याचे एकूण मुल्य 80 कोटी रुपये आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NBCC कंपनीचे शेअर्स 66.20 रुपये या इंट्राडे उच्चांक आणि 63.78 रुपये नीचांक किमतीच्या दरम्यान ट्रेड करत होते.

एनबीसीसी लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीला यापूर्वी देखील विविध ऑर्डर मिळाल्या आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये एनबीसीसी लिमिटेड कंपनीला अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज AYNISHD मुंबई यांच्याकडून इमारतीचे बांधकाम करण्याचे 25.19 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.

ब्रोकरेज फर्म जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, आर्थिक वर्ष 2023-2024 च्या पहिल्या तिमाहीत एनबीसीसी लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकमधून मिळणारा एकत्रित महूसल 45,000 कोटी रुपये होता. एनबीसीसी लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत 8.5 टक्के वार्षिक महसूल वाढ नोंदवली आहे.

ही वाढ PMC विभागातील अंमलबजावणीतील घट आणि रिअल इस्टेट विक्रीत 51 टक्के वार्षिक घट या पाहायला मिळाली आहे. ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2023-24 मधील पहिल्या तिमाहीत व्याज, कर, घसारा आणि EBITDA मार्जिन 32 बेस अंकाने YOY आधारे 3.2 टक्के घसरले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NBCC Share Price NSE 17 October 2023.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x