 
						Mishthann Foods Vs Sarveshwar Foods Share | सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आली आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना अल्प आणि मध्यम मुदतीत मल्टीबॅगर परतावा कमावून देऊ शकतात. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीला राष्ट्रीय स्तरावरील मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी KRIBHCO कडून धोरणात्मक पुरवठादाराचा दर्जा देण्यात आला आहे.
यासह कंपनीला गैर-बासमती पांढऱ्या तांदळाचा पुरवठा करण्याची 12.7 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनी KRIBHCO सोबत धोरणात्मक पुरवठादार म्हणून संलग्न झाल्याने सर्वेश्वर फूड्स कंपनीचा व्यवसाय विस्तार झपाट्याने होणार आहे. आज बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी सर्वेश्वर फूड्स लिमिटेड स्टॉक 4.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
सर्वेश्वर फूड्स कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड ही जम्मू-काश्मीर स्थित कंपनी 2004 साली स्थापन झाली होती. ही कंपनी मुख्यतः बासमती तांदळाच्या उत्पादन, व्यापार आणि निर्यात संबंधित व्यवसाय करते. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअर धारकांना 65.2544 कोटी इक्विटी शेअर्स बोनस शेअर्स म्हणून वाटप केले आहेत.
सर्वेश्वर फूड्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. यासह सर्वेश्वर फूड्स कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 1 रुपये दर्शनी मूल्याच्या 10 तुकड्यांमध्ये विभाजित केले आहेत. बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट घोषणेनंतर सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत होते.
मागील 3 वर्षांत सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 8 रुपयेवरून वाढून 116 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअरने नीचांक किंमत पातळीवरून आपल्या गुंतवणुकदारांना 15 पट अधिक नफा कमावून दिला आहे.
सर्वेश्वर फूड कंपनीचे शेअर्स 9 एप्रिल 2020 रोजी 8.45 पैशांवर ट्रेड करत होते. तर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 116 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. याकाळात सर्वेश्वर फूड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 14 पट वाढवले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		