
Plaza Wires Share Price | प्लाझा वायर्स या इलेक्ट्रिकल केबल्स बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स 7 दिवसांपूर्वी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. अवघ्या 7 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. प्लाझा वायर्स कंपनीने आपला आयपीओ 51 ते 54 रुपये प्राइस बँडवर लाँच केला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये गुंतवणूकदारांना शेअर्स 54 रुपये किमतीवर वाटप केले होते.
मागील 7 दिवसात या कंपनीच्या शेअरने 100 रुपये किंमत पार केली आहे. शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी प्लाझा वायर्स स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 107.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच IPO किमतीच्या तुलनेत शेअरची किंमत 99 टक्के वाढली आहे.
12 ऑक्टोबर 2023 रोजी प्लाझा वायर्स कंपनीचे शेअर्स 84 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. सूचीबद्ध झाल्यावर प्लाझा वायर्स कंपनीचे शेअर्स सलग 6 दिवस अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्लाझा वायर्स कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये 107.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 54 रुपये इश्यू किमतीच्या तुलनेत प्लाझा वायर्स या इलेक्ट्रिकल केबल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स तब्बल 99 टक्के मजबूत झाले आहेत. प्लाझा वायर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 75 रुपये होती.
प्लाझा वायर्स कंपनीचा IPO एकूण 161 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 374.81 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 388.09 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 42.84 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.
प्लाझा वायर्स कंपनीचा IPO 29 सप्टेंबर 2023 रोजी ते 5 ऑक्टोबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या सार्वजनिक IPO चा एकूण आकार 71.28 कोटी रुपये होता. प्लाझा वायर्स कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आले आहेत. ही कंपनी इलेक्ट्रिकल केबल्स व्यतिरिक्त, प्लाझा पंखे, हिटर आणि इस्त्री बनवण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.