14 December 2024 2:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

HFCL Share Price | शेअरची किंमत 84 रुपये, अल्पावधीत 24% परतावा दिला, रिलायन्सची गुंतवणूक असलेला शेअर वेळीच खरेदी करा

HFCL Share Price

HFCL Share Price | एचएफसीएल भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स प्रचंड उलाढालीला सामोरे जात आहेत. नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे, आणि शेअर बाजारात किंचित विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. याचाच परिणाम एचएफसीएल कंपनीच्या शेअरवर देखील पाहायला मिळत आहे.

एचएफसीएल या कंपनीचे मुख्य कार्यालय गुरुग्राम येथे स्थित आहे. ही कंपनी मुख्यतः दूरसंचार क्षेत्रासाठी फायबर-ऑप्टिक केबल्स आणि इतर संबंधित इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन आणि उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. आज मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी एचएफसीएल स्टॉक 0.30 टक्के घसरणीसह 84.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच एचएफसीएल कंपनीला 1127 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ही सकारात्मक बातमी येताच हा स्टॉक 4 टक्क्यांच्या वाढीसह 90 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील एका आठवड्यात एचएफसीएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 10 टक्के वाढली होती. तर मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के नफा कमावून दिला होता. मागील एका वर्षात एचएफसीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना फक्त 10 टक्के नफा मिळवून दिला आहे.

मागील तीन वर्षांत एचएफसीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 250 टक्के अधिक नफा कमावून दिला आहे. नुकताच एचएफसीएल कंपनीने आपली 90 टक्के मालकी असलेली उपकंपनी Reddef द्वारे पाळत ठेवणाऱ्या रडार बनवले आहे. Raddef ही कंपनी रडार आणि RF सोल्यूशन्स संबंधित विशेष संशोधन आणि विकास सेवा प्रदान करणारी कंपनी आहे.

जून 2023 तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत एचएफसीएल कंपनीच्या प्रवर्तकांनी आपला वाटा 39.24 टक्क्यांवरून कमी करून 37.84 टक्क्यांवर आणला आहे. कंपनीच्या प्रवर्तकांनी आपल्या एकूण स्टेकपैकी 44.68 टक्के भाग तारण ठेवला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HFCL Share Price NSE Live 02 January 2024.

हॅशटॅग्स

HFCL Share Price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x